आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नोकरी सोडून स्वत:ची आयटी कंपनी सुरू करत इतरांना दिला रोजगार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

  सोलापूर - विंचूर (ता. दक्षिण सोलापूर) येथे अडीच एकर शेती, मुलांच्या शिक्षणासाठी वडील शेतात काम करून दुसऱ्याकडे रोज १०० रुपयांसाठी शेतमजुरी काम करून रवींद्र बगले यांनी शिक्षण पूर्ण केले. प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळेत घेऊन पुढे एमसीएपर्यंत शिक्षण सोलापूर विद्यापीठातून पूर्ण केले. सोलापूर विद्यापीठास इतरत्र वाव नाही, हे वाक्य खोडून काढत पुण्यात आयटी क्षेत्रात काम केले. मलेशियात चार महिने काम करून स्वत:च्या शहरात परतून आयटी क्षेत्रात काम करण्याची जिद्द बाळगली. सोलापूरला विमानतळ नसल्याने २०० कोटींचे काम मिळाले नाही. तरी परदेशातील सुमारे १० ते १२ देशातील कामे करत प्रतिमहा ७५ हजार रुपये नोकरी देेणारा तरुण बगले यांनी जिद्दीने पुढे जातोय. जुळे सोलापुरातील एका बंगल्यात दोन पाळीत आयटीचे काम सुरू केले आहे. 


बगले हे पुण्यात एका आयटी कंपनीत होते. त्यांनी केलेल्या कामावर ती कंपनी रोज १५ हजार रुपये कमवत होती. तर यांना मात्र प्रतिमहा १५ हजार देत होते. हे लक्षात आल्यावर कंपनीकडे वेतन वाढीची मागणी केली. ते दिले नाही म्हणून बगले यांनी नोकरी सोडली. 

 

आंतरराष्ट्रीय अनुभव घेतला 
मलेशियात चार महिने काम केल्यानंतर, आपणच आयटी काम सुरू करावे ,असा विचार आला. आपल्याकडे भांडवल नाही म्हणून विचार केला. जुळे सोलापुरात भाड्याने घर घेऊन ९० हजारांच्या संगणकावर मित्र बोम्मा यांच्यासोबत काम सुरू केले. हे काम करत असताना नामांकित कंपन्याच्या नोकऱ्या आल्या. पण ते न करता स्वत:च काम सुरू केले. जुळे सोलापुरात बंडे नगरात एका घरात दोन कंपन्या सुरू केल्या असून, दिवसा १० युवक काम करतात. रात्री पाच युवक काम करतात. कारण परदेशात त्यावेळी दिवस असतो. तेथील कंपन्याशी संलग्न राहण्यासाठी रात्री काम करावे लागते. बगले यांच्याकडे असलेल्या युवकांना १५ ते ७५ हजारांपर्यंत वेतन दिले जाते 
 

२०० कोटींचे काम गेले 
२०० कोटींचे काम होते. पण सोलापुरात विमानतळ नसल्याने बगले यांना त्या कंपनीशी करार करता आला नाही. त्या कंपनीने शेअर चॅटशी २०० कोटींचा करार केला. गुगल कंपनीसोबत जाहिरात करार आहे. सिंगापूर येथील कंपनीस मेसेंजर अॅप बनवून दिला तर व्हिएतनाम येथे हंगामी अॅप केले. त्यासाठी दोन वर्षे काम केले. मलेशिया, थायलंड, फिलीपाइन्स, सिंगापूर, व्हिएतनाम येथील कामे केली. सोलापूर विद्यापीठाचे कॅशलेस सिस्टिमचे काम करून दिले. एक कंपनीचे अॅप केले. त्यात एखादी वस्तू विक्री करताना घासाघिस करता येते. 

 

पुढे हे करणार... 
सोलापूरसाठी २४ बाय ७ द्वारे सर्व प्रकारचे सर्व्हिस देणारी यंत्रणा उभे करून काम करायचे आहे. नागरिकांना नळ फिटर, गवंडी, पेंटर आदी सुविधा देण्याचा मानस आहे. सोलापुरात आयटी क्षेत्र सुरू करण्याचा मानस आहे. त्यासाठी त्यांना सहकारमंत्री सुभाष देशमुख यांचे सहकार्य मिळत असल्याचे रवींद्र बगले यांनी सांगितले. 
 

बातम्या आणखी आहेत...