आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रविंद्र भेगडे यांचा उमेदवारी अर्ज मागे, मुख्यमंत्र्यांसह दानवेंशी चर्चा केल्यानंतर घेतला निर्णय

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - मावळ विधानसभा मतदारसंघात राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्याविरुद्ध अपक्ष अर्ज दाखल करणारे भाजप नेते रविंद्र भेगडे यांनी अर्ज मागे घेतला आहे. रविंद्र भेगडे यांनी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि रावसाहेब दानवे यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. त्यानंतरच भेगडे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा निर्णय जाहीर केला आहे. भाजपने बाळा भेगडेंना मावळची उमेदवारी दिल्याने ते नाराज होते. त्यामुळे भाजपकडूनच इच्छुक असलेल्या सुनील शेळके यांनी राष्ट्रवादीचे तिकीट मिळवले. तर रविंद्र भेगडे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता.

गेल्या तीन महिन्यांपासून रविंद्र भेगडे, बाळा भेगडे आणि सुनील शेळके या तिघांनीही भाजपच्या प्रचारासाठी घरोघरी संवाद साधला. अशात तिघांनाही आपल्यालाच उमेदवारी मिळेल अशी अपेक्षा होती. परंतु, भाजपने ऐनवेळी बाळा भेगडे यांना तिकीट दिले. यानंतर मावळमध्ये भाजप नेत्यांसह कार्यकर्त्यांमध्ये बंडखोरीचा सूर होता. परिणामी दोन्ही भाजप इच्छुकांनी भाजपच्या अधिकृत उमेदवाराला टक्कर देण्याचा निर्णय घेतला. परंतु, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि रावसाहेब दानवे यांनी रविंद्र भेगडे यांची समजूत काढली.