आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संजय मांजरेकरांच्या वक्तव्याला रवींद्र जडेजाचे सडोतोर उत्तर, म्हणाला-'तुमची बडबड बंद करा, तुमच्यापेक्षा जास्त सामने खेळलो आहे...'

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाने माजी क्रिकेटपटू आणि कॉमेंटेटर संजय मांजरेकरांच्या ट्वीटला सडेतोड उत्तर दिले आहे. ट्विटरवर झालेल्या खडाजंगीत जाडेजाने मांजरेकरांना आरसा दाखवला. जडेजा म्हणाला- "मी तुमच्यापेक्षा जास्त सामने खेळलो आहे, अजूनही खेळत आहे. खेळाडूंनी जे मिळवलंय त्याचा सन्मान करणे शिका".


काय आहे प्रकरण?
संजय मांजरेकरांनी भारतीय संघातील जडेजाच्या समावेशाबद्दल वक्तव्य केले होते. भारताचा इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात पराभव झाल्यानंतर जडेजाला संघात घेण्याची चर्चा सुरू होती. त्याबाबत मांजरेकर म्हणाले, "अर्धी बॅटिंग आणि अर्धी बॉलिंग करणारा खेळाडू नको. वन-डेमध्ये जडेजा अर्धी बॅटिंग आणि अर्धी बॉलरची भूमिका निभावतो. कसोटीत तो बॉलर म्हणूनच खेळतो. पण वन डे सामन्यात स्पेशालिस्ट बॅट्समन किंवा बॉलर हवा, जो जडेजा नाही."


मांजरेकरांच्या वक्तव्यावर जडेजाचे उत्तर
संजय मांजरेकरांच्या टीपणीनंतर जडेजा चांगलाच संतापला. त्याने ट्विटरवर मांजरेकरांना टॅग करुन राग व्यक्त केला. जडेजा म्हणाला, "तुम्ही जेवढे सामने खेळलेत, त्यापेक्षा दुप्पट सामने मी खेळलो आहे आणि आताही खेळत आहे. ज्यांनी काहीतरी मिळवलंय, त्यांचा सन्मान करायला शिका. तुमच्या बडबडीबद्दल मी बरंच ऐकलं आहे." 


अष्टपैलू रवींद्र जडेजाने आतापर्यंत 151 वन डे सामन्यात 2035 धावा केल्या आहेत. याशिवाय त्याने 174 विकेट्सही घेतल्या आहेत. तर दुसरीकडे संजय मांजरेकरांनी 74 वन डे सामन्यात 1994 धावा केल्या आहेत. त्यांच्या नावावर केवळ 1 विकेट आहे. कसोटीत जडेजाने 41 सामन्यात 1485 धावा आणि 192 विकेट्स घेतल्या आहेत. तर संजय मांजरेकर यांनी 37 कसोटी सामने खेळले असून शून्य विकेट त्यांच्या नावावर आहे.

बातम्या आणखी आहेत...