Home | Sports | Cricket | Off The Field | Ravindra Jadejas Man of the Match award replica found dumped in the garbage

कचऱ्याच्या ढिगाऱ्यात सापडला रविंद्र जाडेजाचा मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड....

दिव्य मराठी वेब टीम | Update - Nov 11, 2018, 12:03 AM IST

फोटोत एक कर्मचारी हातात चेक घेऊन थांबलेला दिसत आहे.

 • Ravindra Jadejas Man of the Match award replica found dumped in the garbage

  स्पोर्ट् डेस्क- भारत आणि वेस्टइंडीज यांच्यामध्ये सध्या तीन मॅचची टी-20 सीरीज खेळली जात आहे. या सीरीजमध्ये भारताने 2-0 अशी आघाडी घेतली आहे. सीरीजचा तीसरा मॅच रविवारी बंगळुरुच्या एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये खेळला जाणार आहे. या सीरीजमध्ये ऑलराउंडर रविंद्र जडेजाला आराम दिला आहे, पण तरिही जडेडा चर्चेत आला आहे. चर्चेचा विषय म्हणजे त्याचा मॅन ऑफ द मॅचचा चेक.

  कचऱ्याच्या ढिगाऱ्यात सापडला रविंद्र जाडेजाचा मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड
  वेस्टइंडीजविरूद्धच्या पाचव्या आणि शेवटच्या वनडे मॅचमध्ये रविंद्र जाडेजाने उत्कृष्ट गोलंदाजी केली होती. त्याने 34 रन देऊन 4 विकेट घेतल्या होत्या. त्यासाठी त्याला मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड मिळाला होता. पण सध्या सोशल मीडियावर रविंद्र जाडेजाला मिळालेला मॅन ऑफ द मॅचचा एक लाख रुपयाचा चेकची प्रतिकृती कचऱ्याच्या ढिगाऱ्यात मिळाल्याची बातमी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल झालेल्या या फोटोत एक कर्मचारी हातात चेकला घेऊन थांबलेला दिसत आहे.

  एनजीओने केला दावा
  केरळच्या एका एनजीओने दावा केला आहे की, हा चेक रविंद्र जाडेजाचा आहे. सांगितले जात आहे की, सफाई कर्मचाऱ्याला स्टेडियमचा कचरा साफ करताना हा चेक मिळाला.

Trending