आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिरूबाई भाग गयी!

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रवींद्र वानखडे  

सकाळी दहा-अकरा वाजेच्या सुमारास हिरूबाई गावात अवतरली. कोअर क्षेत्रातील घनदाट जंगलाकडून ती येत होती. मात्र परतताना तिचा अवतार भयानक झाला होता. केस विस्कटलेले होते, डोळ्यावरील मांस लोंबकळत होते, चेहरा रक्तबंबाळ झाला होता आणि कपडे रक्ताने माखलेले होते. नेहमी तिची टिंगल करणाऱ्या  द्वाड कार्ट्यांची तो अवतार बघून बोबडीच वळली होती.  
 
जेवणासाठी कार्यालयातून उठण्याच्याच बेतात होतो, तेवढ्यात फोन खणखणला.  पलीकडून आवाज आला, “हिरूबाई दवाखाने से भाग गयी है!” धक्काच बसला... पंधरा दिवसांपासून नागपूरच्या एका खासगी रुग्णालयात हिरूबाईचे उपचार सुरू होते, सगळं सुरळीत होतं आणि अचानक असं काय घडलं?  दोन तासांच्या धावपळीनंतर हिरूबाई दवाखान्याच्या तळमजल्याच्या जिन्याच्या पायऱ्यांखाली दडून बसल्याचे आढळून आल्याचा निरोप आला आणि पंधरा-वीस दिवसांपासून सुरू असलेली धावपळ नजरेसमोर तरळून गेली. 
 
मेळघाटातील दोधरा गावची हिरूबाई. वय वर्षे पन्नास... थोडीफार वेडसर... गावोगाव भटकायची. वेळी-अवेळी हिरूबाई कुठल्याही  गावात पोहोचली तरी ‘दोधराची सम्राज्ञी’ म्हणून तिला कुणीतरी ओळखायचे आणि आपोआपच तिचं आदरातिथ्य होऊन जायचं. असेच एकदा ती डोलार गावच्या एका कार्यक्रमात सहभागी झाली आणि त्या रात्री तिथेच ‘मेहमान’ म्हणून राहिली. फटफटल्याबरोबर कुणालाही न सांगता हिरूबाईने तिच्या गावाची वाट धरली. कुणालाही खबर नव्हती. सकाळी दहा-अकरा वाजेच्या सुमारास हिरूबाई गावात अवतरली. कोअर क्षेत्रातील (संरक्षित जंगल) घनदाट जंगलाकडून ती येत होती. मात्र परतताना तिचा अवतार भयानक झाला होता. केस विस्कटलेले होते, डोळ्यावरील मांस लोंबकळत होते, चेहरा रक्तबंबाळ झाला होता आणि कपडे रक्ताने माखलेले होते. नेहमी तिची टिंगल करणाऱ्या  द्वाड कार्ट्यांची तो अवतार बघून बोबडीच वळली होती.  

देहभान नसलेल्या हिरूबाईने तिच्या नकळत अस्वलाशी झुंज घेतली होती. स्वत:च्या गंभीर स्थितीची तिला कल्पना नव्हती. तीस बिऱ्ह‍ाडांच्या डोलार गावात पाच वन-कर्मचारी होते. ते लगेच कामी लागले.  बिनतारी संदेश यंत्रणेवरून सूचना दिल्या गेल्या. लगेच बातमी परतवाड्याला आमच्यापर्यंत पोहोचली. चाळीस मिनिटात वनविभागाची गाडी घटनास्थळी हजर होती.  बिजूधावडी येथील प्राथमिक स्वास्थ्य केंद्र, धारणी उपजिल्हा रुग्णालय आणि शेवटी  जिल्हा सामान्य रुग्णालय, अमरावती असा जखमी हिरूबाईचा प्रवास झाला. मला हिरूबाईचे प्रथम दर्शन जिल्हा सामान्य रुग्णालय, अमरावती येथे घडले.  तिथे तिच्या कवटीला इजा झाली असल्याचे निदान झाले आणि हिरूबाईचा प्रवास नागपूरच्या मेडिकल कॉलेज रुग्णालयाकडे सुरू झाला. तिच्या कवटीवर अवघड शस्त्रक्रियेची आवश्यकता सांगण्यात आली होती. 

दोन दिवसांनंतर मी नागपूरच्या मेडिकल कॉलेज रुग्णालयात जाऊन हिरूबाईला भेटलो. सरकारी रुग्णालयात नेहमीच्या गतीने तिचे उपचार सुरू होते. उपचारात कुठलीच प्रगती नव्हती. शस्त्रक्रियेसाठी ती प्रतीक्षा यादीत होती. मला विचित्र अशी हुरहूर लागली. एका अतिसामान्य, दरिद्री, आदिवासी रुग्णास तिथल्या गर्दीत उपचारासाठी प्राथमिकता मिळण्याची अपेक्षा करणेसुद्धा भाबडेपणाचे होते. केवळ सरकारी कर्तव्य म्हणून तिथे पोहोचलेल्या माझ्या मनावर  माणुसकीच्या भावनेने मात केली. तिथे हजर असलेल्या हिराबाईच्या मोठ्या मुलाला मी म्हटले, “ फिकर नहीं करना, दीदी को हम  ठीक करवा के रहेंगे.”  माझ्या तोंडून हिरूबाईसाठी ‘दीदी’ शब्द उमटल्याचे मलाही आश्चर्य वाटले. तातडीने मोबाइईलद्वारे सर्व रिपोर्ट‌्स नागपूरचे  शल्यचिकित्सक डॉ. मदन कापरे यांच्याकडे पाठविले. त्यांनी शासकीय रुग्णालयाच्या डॉक्टरांशी चर्चा केली.  डॉ. मदन कापरेंनी शब्द दिला “उपचारांची पुढची जबाबदारी माझी. केवळ औषधांचा खर्च वन-विभागातर्फे करावा, इतर सगळी जबाबदारी साऊथ रोटरी क्लब, नागपूर सांभाळून घेईल.”  मनात म्हटले, “गेल्या जन्मी हिरूबाईची कृपादृष्टी लाभलेले सगळे याच क्षणाच्या प्रतीक्षेत होते की काय ?” 

शासकीय रुग्णालयातून निघून हिरूबाईचा तळ आता नागपूरच्या ‘नीती’ या तारांकित रुग्णालयात पडला. नागपूरचे उपवनसंरक्षक मल्लिकार्जुन व तेथील वन-कर्मचाऱ्यांनी मनोभावे मदत केली. सगळी व्यवस्था लावून मी परतलो होतो. पंधरा दिवसांपर्यंत सगळे ठीक चालले होते आणि अचानक आज हिरूबाई दवाखान्यातून निघून गेल्याच्या बातमीने विचलित झालो होतो! पण दोन तासांत परिस्थिती नियंत्रणात आली होती.  तरी भविष्यात पुन्हा असे काही होणार नाही याची खात्री नव्हतीच.  

...आणि तसेच घडले. पंधरा दिवसांनंतर मला रात्री दोनच्या सुमारास पुन्हा फोन आला...  “हिरूबाई भाग गयी.” हिरूबाई पुन्हा एकदा गायब झाली होती.  पावसाचे दिवस होते, हिरूबाईच्या डोक्यावरील बँडेज ओले झाले तर अनर्थ घडेल ह्या चिंतेतून, अशा अपवेळी सुद्धा नागपूरच्या उप-वनसंरक्षकाकडे मदतीसाठी संपर्क करण्यास मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्रसंचालक रेड्डी साहेबांनी पुढाकार घेतला. वन विभागाचे गस्ती पथक रात्री अडीच वाजता नागपूरच्या रस्त्यावर मेळघाटातील एका आदिवासी महिलेच्या शोधात जुंपले गेले. मी रात्रभर दर तासाने फोनवर सूचना घेत होतो.  हिरूबाईच्या सुखरूप असण्याची चिंताच मनाला घेरून होती, तिच्या बेपर्वा वागण्याचा राग येत नव्हता. सकाळी सात वाजेपर्यंत सुरू असलेली शोधमोहीम निष्फळ ठरली. शेवटी तिच्या मुलाला पोलिस स्टेशनला तक्रार दाखल करण्याचा सल्ला दिला.  सकाळी त्याने अजनी पोलिस स्टेशनला तक्रार दाखल केली आणि तो दवाखान्याकडे परतत असताना त्याला लोकमत चौकातील एका दवाखान्याच्या आवारात लाल रंगाची शाल ओढून पहुडलेली एक महिला दिसली. गरीब कुटुंंबातील ह्या व्यक्तीने आईची फाटकी शाल नेमकी हेरली. हिरूबाई सापडली. यापुढे अधिक सतर्कता बाळगण्याचे आश्वासन आम्ही डॉक्टरांना दिले.
 
प्रकाश कापरे यांच्या औषध भंडारातून औषध पुरवठा सुरू होता. बघता बघता उपचार सुरू होऊन तीन महिने लोटले होते. हिरूबाईच्या डोक्याचे बँडेज निघाले होते. तिला प्रत्यक्ष भेटल्यावर एक वेगळीच चमक तिच्यात जाणवत होती. एकदा ‘दीदी’ म्हटल्यावर जबाबदारी पूर्णत्वाला न्यायचा माझा निर्धार अजूनही कायम होता. हिरूबाईच्या मालिकेच्या शेवटच्या भागात आपण पोहोचल्याची जाणीव होऊ लागली असतानाच ती मात्र मनातल्या मनात “पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त” असे म्हणत असावी.  त्याचे प्रत्यंतर लगेचच आले.  इतक्या दीर्घ उपचारानंतर पुन्हा एकदा हिरूबाई दवाखान्यातून परागंदा झाली. दवाखान्यातील रुग्णांच्या पोशाखात हिरूबाई सटकली होती. आमच पुनश्च हरिओम सुरू झालं. उपवनसंरक्षक मल्लिकार्जुन यांना परत फोन, परत वन विभागाच्या गाड्यांची नागपूरच्या रस्त्यांवर गस्त, त्यांच्या मदतीला मेळघाटातील कर्मचारीसुद्धा पाठविले.  पण हिरूबाई सापडती तर शपथ. एक दिवस, दोन दिवस, आठवडा, पंधरा दिवस...... हिरूबाईच्या मुलाचा धीर सुटू लागला. तो परतीची भाषा बोलू लागला.  मला तर सगळं मुसळ केरात गेल्याच्या जाणिवेने नैराश्य येऊ पाहत होतं. आता शोधमोहीम थंडावली होती.  आणि पुन्हा एकदा चमत्कार घडला.  “हिरूबाई सापडली,” फोनवर स्वत:  प्रकाश कापरे होते. “नागपूर विमानतळ परिसरात डॉ. मदन कापरेंची बहीण राहते. ती बस स्टॉपवर उभी असताना तिला नीती हॉस्पिटलच्या रुग्णांच्या पोशाखातील एक महिला नजरेस पडली. तिने दवाखान्यास सूचना दिली. रुग्णवाहिका पाठवली गेली.  एका कर्मचाऱ्यास रुग्णवाहिका येईपर्यंत त्या महिलेवर दुरूनच पाळत ठेवण्यास कापरेंनी सांगितले.  रुग्णवाहिका वेळेत पोहोचली आणि कर्मचाऱ्यांनी हिरूबाईची बळेच समजूत घालून तिला परत नीती हॉस्पिटलला आणले.  हा मात्र “हिरूबाई एस्केप्स” चा शेवटचा भाग ठरला. पंधरा दिवसांत उपचार पूर्ण करून हिरूबाई तिच्या दोधरा गावात पोहोचली होती. गेल्या आठवड्यात माझा फोन वाजला. “सर, पहचाना क्या? गोविंद बोल रहा हूँ !” मी हिरूबाईच्या मुलाचा आवाज ओळखला. दीदी सुखरूप असल्याचे कळले आणि समाधान वाटले.  शासकीय कर्तव्यापलीकडे जाऊन थोडासा पुढाकार घेतल्यास सामान्यातील सामान्याचे सुद्धा कसे भले होऊ शकते, त्याची प्रचिती या प्रसंगातून आली.  देशसेवेसाठी प्रत्येक वेळी बंदूक घेऊन सीमेवर जायला हवे, असे मुळीच नाही. जिथे आहोत तेथूनच एक अश्रू वंचितांसाठी ओघळला तरी पुरे. 

शब्दांकन : जी. बी. देशमुख

संपर्क : ९४२३१२४८३८

gbdeshmukh21@rediffmail.com

बातम्या आणखी आहेत...