आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देशात भीतीचे वातावरण, प्रश्न विचारण्यावर बंदी : ज्येष्ठ पत्रकार रवीशकुमार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर   - “देशातील मीडिया संपला आहे. चौथा स्तंभ लाठीपुढे झुकलेला आहे. विकला गेला. देशात भीतीचे वातावरण असून त्यातून बाहेर निघण्यासाठी सर्वांनी एकत्र आले पाहिजे. देशाचे सजग नागरिक बना, दर्शक बनू नका. कुणाला नायक बनवू नका व कुणाचे फॅनही होऊ नका,” असे आवाहन ज्येष्ठ पत्रकार रवीशकुमार यांनी केले. 


राष्ट्रपिता जोतिबा फुले अभ्यासिकेच्यावतीने आयोजित स्मृतिशेष मधुकरराव तामगाडगे शिष्यवृत्ती समारंभात ते बोलत होते. या वेळी नागालँडचे पोलिस महानिरीक्षक संदीप तामगाडगे, सिद्धार्थ गायकवाड, दिल्ली येथील जीएसटी उपायुक्त डॉ. प्रशांत रोकडे, कुसुमताई तामगाडगे उपस्थित होत्या. या वेळी ५० अनाथ मुलींना शिष्यवृत्ती व शैक्षणिक साहित्य प्रदान करण्यात आले. रवीशकुमार म्हणाले, देशात भीतीचे वातावरण आहे. प्रश्न विचारण्यावरही बंदी आहे. माहिती घेण्याचे सर्व मार्ग बंद झाले आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त प्रश्न विचारण्याचे प्रयत्न करा. देशातील वृत्तवाहिन्या विकल्या गेल्या आहेत. त्यामुळे आगामी अडीच महिने वाहिन्या पाहणे बंदच करा. केवळ दर्शक बनू नका, नागरिक बना. बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून सर्वांना एकत्रित केले. तसाच लढा देण्याची गरज अाहे. २०० वर्षे इंग्रजांनी देशाला लुटले. आता आपलेच लोक आपल्याला लुटत आहेत, असा आरोपही त्यांनी केला.    


मागील ५ वर्षांत देशात अंधकारमय वातावरण   
मागील पाच वर्षांत देशात अंधकारमय वातावरण आहे. बोलण्यापूर्वी विचार करावा लागतो. संविधानामुळे अनुसूचित जातींचे लोक मोठ्या संख्येने सरकारी नोकऱ्यांत आहेत. ते समाजासाठी काहीही करायला तयार नाहीत. ते मनातील गोष्टी बोलू शकत नाही, अशी खंत नागालँडमध्ये पोलिस महानिरीक्षक व मुख्यमंत्र्यांचे सल्लागार आयपीएस अधिकारी संदीप तामगाडगे यांनी व्यक्त केली.

बातम्या आणखी आहेत...