भाजपचा जाहीरनामा लोकांच्या / भाजपचा जाहीरनामा लोकांच्या स्मरणात, असाच जाहीरनामा विरोधकांचाही असावा, ज्यावर चर्चा होईल : रवीश कुमार

रवीश कुमार

Nov 11,2018 08:07:00 AM IST

ज्येष्ठ पत्रकार रवीश कुमार यांना वाटते की नरेंद्र मोदी यांनी निवडणूक विजयात विक्रम नोंदवला. त्यांना आपण हरवू शकतो की नाही हे आव्हान विरोधी पक्षांना स्वीकारावे लागणार आहे. अशा विविध मुद्द्यांवर भास्करच्या अनिरुद्ध शर्मा यांनी त्यांच्याशी केलेली बातचीत

प्रश्न- नरेंद्र मोदी यांना पराभूत करणे सध्या तरी अशक्य वाटते काय?
उत्तर
- कोणी हरवू इच्छित असेल तर हरवू शकतो. हरवायचे होते म्हणून बिहार-दिल्लीत हरवले. कर्नाटकात खूप प्रयत्न करूनही विजय मिळाला नाही. काश्मीर चालवता आले नाही. गोव्यात कसे तरी सरकार बनवले. ती गोष्ट निराळी की तुम्ही तर्कांना जागा देता. मात्र निवडणूक जिंकण्याचा विक्रम तर मोदी यांचाच आहे. हे आव्हान विरोधकांना स्वीकारावे लागणार आहे की, ते मोदींना हरवणार की नाही?


-प्रश्न-भाजपकडे काय मुद्दे असतील?
उत्तर
- सांगण्यासाठी तर खूप काही आहेत. आम्ही पेट्रोल ९० रुपये केले. नोकऱ्या देता आल्या नाहीत. एमएसपी डबल देता आली नाही, ज्याचे आश्वासन दिले होते. इतर म्हणजे त्यांचे मंत्री रोज पीएमचे ट्वीट रीट्वीट करतच आहेत. तुम्ही प्रकाश जावडेकर यांच्या ट्वीटर हँडलवर जा. ते हेच सांगतील की पाच वर्ष मनुष्यबळ विकास मंत्री असताना आम्ही पंतप्रधानांचे साडेतीन हजार ट्वीट रीट्वीट केले.


-प्रश्न- या निवडणुकीत काँग्रेसकडे मोदी सरकारविरुद्ध काय मुद्दे असतील?
उत्तर
- काँग्रेसला सांगावे लागेल की त्यांची काय रणनीती आहे. तुम्हाला जर पूर्ण टीकाच करायची असेल तर जसे की मोदींचे शिक्षण धोरण, त्यावर काय टीका करणार? आणि त्याचा पर्याय काय? आम्ही हरवू, आम्ही जिंकू, असे थोडेच होईल? हा काय डब्ल्यूडब्ल्यूचा सामना आहे? हे चांगले झाले की गेल्या वेळी यांचा (भाजप) जाहीरनामा लोकांनी लक्षात ठेवला. तसाच जाहीरनामा विरोधकांचाही असायला हवा. लोकांनी त्याला दीर्घकाळ स्मरणात ठेवायला हवे. त्यावर चर्चा व्हावी. हा जाहीरनामा ठोस हवा. कारण जो सत्तेवर येईल त्याची जबाबदारी निश्चित व्हायला हवी. सविस्तरपणे सांगा की नोकऱ्यांचे काय करणार? यांनी तर दिल्या नाहीत, तुम्ही काय देणार? सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे संस्थांची विश्वासार्हता आणि स्वायत्तता कशी निश्चित करणार?

-प्रश्न - यूपीत सपा-बसप आघाडी झाल्यास भाजप विजय मिळवेल?
उत्तर
- अखिलेश म्हणत आहेत की ते दोन पावले मागे येतील. मायावती म्हणत आहेत, सन्मानजनक जागा मिळाल्यास आघाडी नक्की. या सन्मानजनक जागा काय असतात? त्या अटी घालत आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे कोणाच्याही ७१ जागा यायला नकोत. मला वाटणार नाही नाही की कोणालाही १०० टक्के विजय मिळावा. कोणताही पक्ष इतका शक्तिशाली व्हायला नको की तुम्ही प्रश्न विचारत राहाल आणि तो उत्तरच देणार नाही.


- प्रश्न- केंद्रातील नरेंंद्र मोदी सरकारच्या काळात जातीयवाद वाढल्याचा विरोधकांचा आरोप आहे.
उत्तर
- अगदी योग्य आरोप आहे. कितीतरी लोकांना लिंचिंगमध्ये प्राण गमवावे लागले. सांप्रदायिकता तर वाढलीच आहे. मोदी सरकारने जी राजकीय संस्कृती दिली त्याचा परिपाक पाहा. टीका केल्यास अतिशय घाणेरड्या भाषेत उत्तर मिळते. सांप्रदायिकतेचा मुद्दा नसेल तर विरोधक जनतेत जाण्याचा लायक नाहीत.

- रवीश कुमार

सीनियर एक्झिक्युटिव्ह एडिटर, एनडीटीव्ही

X
COMMENT