Home | Maharashtra | Vidarva | Akola | ravishankar verma from beed will be appear in 3 international films

बुलडाणा: मेहकरच्या रविशंकर शर्मा यांची चित्रपट क्षेत्रात भरारी

प्रतिनिधी | Update - Aug 26, 2018, 12:36 PM IST

आयुष्यात मोठं होण्याच्या प्रक्रियेत स्वत:च्या बुद्धीची, कुवतीची, प्रयत्नशिलतेची कास धरून आपल्या आवडत्या क्षेत्रात चमक द

 • ravishankar verma from beed will be appear in 3 international films
  मेहकर - आयुष्यात मोठं होण्याच्या प्रक्रियेत स्वत:च्या बुद्धीची, कुवतीची, प्रयत्नशिलतेची कास धरून आपल्या आवडत्या क्षेत्रात चमक दाखवून खऱ्या अर्थाने स्वत:ला सिद्ध करत जीवन यशस्वी करण्याची पराकाष्ठा करत राहणं ही जीवन सार्थ करण्याची खरी रीत आहे. हीच रीत शहरातील रहिवासी रविशंकर शर्मा यांनी जोपासली आहे. इंग्रजी जर्मन व हिंदी या तीन भाषेत बनणाऱ्या ग्लोरीअस डेड या आंतरराष्ट्रीय चित्रपटात ते झळकणार आहेत.

  नियती ने कुणाच्या पुढ्यात काय वाढले आहे हे नियतीलाच माहित. अगदी लहानपणीच पित्याचे छत्र हरविल्यानंतर प्रत्येक पावलावर अतिशय प्रतिकूल परिस्थितीशी सतत झगडून स्वत:ला सिद्ध करताना आपली आवड ही जोपासणे खुप कठीण असते. परंतु, दुर्दम्य इच्छाशक्ती असल्यामुळे रविशंकर यांनी त्यांच्यातील कलाकार आपल्या मनाच्या कुप्पीत नेहमी जपला. संधी मिळताच या आतल्या कलाकाराने शाळा, काॅलेजची स्नेहसंमेलने आणि व्यासपीठ नेहमीच गाजवली. त्यांच्यात लेखन कौशल्यासोबतच इतरही अनेक अंगभूत गुणांचे वास्तव्य दृष्टीपथात आल्याने शिक्षकांनी व जवळच्या मित्रांनी त्यांना नेहमी प्रोत्साहन दिले. कलेच्या अनुषंगाने मेहकर ते मुंबई असा प्रवास सातत्याने करावा लागला. यात त्यांना जीवलग मित्रांची चांगलीच साथ मिळाली. हा चित्रपट इंग्रजी, जर्मन ,हिंदी या तीन भाषांमधे चित्रित होत आहे. फ्रान्स आणि भारतात चित्रित होत असलेल्या या आंतरराष्ट्रीय चित्रपटात फ्रान्स, जर्मनी, अल्बँनिया, रशिया व भारत या देशातील कलाकारांनी काम केले आहे. त्यात रविशंकर शर्मा हे एक आहेत, हे विशेष.

  रविशंकर शर्मा यांना अजुन एक मराठी चित्रपट तू फक्त हो म्हण चालून आला. हा चित्रपट सध्या निर्माणाधीन आहे. या चित्रपटाचे सध्या चित्रीकरण सुरू आहे.

  डॉ. सुदिप सरकार यांनी दिली भूमिका
  कॅमेरा मागे ही महत्वाची भुमिका बजावत असतानाच बंगालचे सुप्रसिद्ध लेखक व दिग्दर्शक डॉ. सुदिप रंजन सरकार यांनी त्यांना हेरले व आपल्या ग्लोरीअस डेड या आंतरराष्ट्रीय चित्रपटात रविशंकर यांना विशेष भूमिका दिली आहे.

  आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात पुरस्कार
  जीवन संघर्षाच्या जगरहाटीत असतानाच त्यांना पल्याडवासी या मराठी चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. या संधीचं त्यांनी अक्षरशा सोनं केलं. पल्याडवासीला १४ देशातील विविध आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात एकूण १०० लाँरेल्स चिन्ह आणी ३४ पुरस्कार मिळाले आहेत. या चित्रपटात रविशंकर शर्मा यांचे रूबाबदार व्यक्तीमत्व, भारदस्त आवाज, रोखठोक शब्दफेक , मिश्कीलपणे हसणे, त्यानी रंगविलेली खलनायकी छटा असलेली पोलिस ऑफिसरची भूमिका प्रेक्षक व ज्युरींना खुपंच भावली. त्यांचा अभिनयाचा हा बहर चित्रपट क्षेत्रातील मंडळी ही बघत होती.

Trending