आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Loksabha2019 जालन्याचा गड रावसाहेब दानवेंनी राखला, तर नंदुरबारमध्ये हीना गावित विजयी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जालना,नंदुरबार- लोकसभेचे निकाल हुल-हळू समोर येत आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवेंनी आपली विजयी परंपरा कायम राखली आहे. 1999 पासून रावसाहेब दानवेच येथून विजयी होत आलेले आहेत. त्यांच्याविरूद्ध यावेळी काँग्रेसचे विजय औताडे मैदानात होते. तर दुसरीकडे नंदुरबार लोकसभा मतदारसंघातून भाजपतर्फे डॉ. हीना गावित विजयी झाल्या आहेत. त्यांच्याविरूद्ध काँग्रेसचे के.सी. पाडवी होते, तर वंचित आघाडीतर्फे दाजमल मोरे मैदानात होते. 

 

असा होता नंदुरबारचा 2014 चा निकाल
2014 मध्ये सलग 9 वेळा खासदार राहिलेल्या काँग्रेसच्या माणिकराव गावितांना पराभवाची धुळ चाखत भाजपच्या हीना गावितांनी 5,79,486 मते मिळवली होती. तर काँग्रेसतर्फे माणिकराव गावितांना 4,72,581 मते मिळाली होती. 


असा होता जालन्याचा 2014चा निकाल
2014 च्या लोकसभा निवडणुकीत जालन्यातून भाजपच्या रावसाहेब दानवेंनी काँग्रेसच्या विलासराव औताडेंचा पराभव केला होता. रावसाहेब दानवेंना 5,91,428 मते मिळाली होती, तर विलासराव औताडेंना 3,84,630 मते मिळाली होती. 

बातम्या आणखी आहेत...