आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सातत्याने पतीकडून मारहाण, मुलाला जिवे मारण्याच्या प्रयत्नामुळे साेडले घर; अाता बाॅक्सर राॅलिंग्स वर्ल्ड चॅम्प 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कानकुन - ऑस्ट्रेलियाच्या बेक रॉलिंग्सने अापल्या करिअरमध्ये बेयर-नकल बॉक्सिंगच्या फ्लायवेट गटातील जागतिक स्तरावरचाा किताब कायम ठेवला. यावरील वर्चस्व कायम ठेवण्यात तिला यश अाले. तिने यासाठी शनिवारी रात्री फायटिंग चॅम्पियनशिपमध्ये मेक्सिकाेच्या सेसेलिया फ्लाेरेसचा पराभव केला. तिने या लढतीत अाक्रमक खेळी करताना फ्लाेरेसला एकापाठाेपाठ एक जाेरदार ठाेसे लावले. या जबरस्त पंचमुळे तिच्या नाका-ताेंडातून रक्त अाहे. यातून बेक रॉलिंग्सला पंचांनी तिसऱ्या फेरीतच विजयी घाेषित केले. पतीच्या मारहाणीमुळे ती या बाॅक्सिंग खेळाकडे वळली. यातच तिने वर्ल्ड चॅम्पियनचा बहुमान पटकावला. 

 

"मी या खेळासाठी अाणि हा खेळ माझ्यासाठी अाहे.'' अशी प्रतिक्रिया ऑस्ट्रेलियाची मिक्स मार्शल आर्टिस्ट बॉक्सर रॉलिंग्सने दिली. तिने अनेक वर्षे शारीरिक अाणि मानसिक त्रास सहन केला. मात्र, याच बाॅक्सिंगच्या अाधारे तिला नव्याने अापली अाेळख निर्माण करता अाली. ती अाज जगात अव्वल बाॅक्सर अाहे. 

 

बॉक्सिंगने मला : बॉक्सिंगने मला स्वत:वर प्रेम करायला शिकवले, मानसिकरीत्या मजबूत बनवले 


डेन हयाटसाेबत घालवलेले गत वर्ष हे माझ्यासाठी अधिकच कठीण अाणि धाेकादायक हाेते. यादरम्यान मला अनेक यातना सहन कराव्या लागल्या. मात्र, हे क्षण अाठवल्यानंतर अाता डाेळ्यात अश्रू येत नाही. कारण, त्यासाठी मी स्वत:ला त्या पद्धतीने मजबूत बनवले अाहे. काही जखमांचे घाव हे अधिकच खाेल असतात. ते थेट मनालाच वेदना करतात. माझ्याबाबतीतही असेच काही झाले. मात्र, मी यात कधीही डगमगली नाही. माेठ्या धाडसाने येणाऱ्या परिस्थितीचा सामना केला अाणि अाज जागतिक स्तरावर वेगळी अाेळख निर्माण केली.

त्यादरम्यान त्या अाेढावलेल्या परिस्थितीतच राहिले असते, तर, मला हा प्रगतीचा माेठा पल्ला गाठाताच अाला नसता. लग्नानंतरचे काही दिवस चांगले गेले. मात्र, त्यानंतर सातत्याने पती मला लहान-सहान गाेष्टीवरून बेदम मारहाण करू लागला. यातून मला वाचवण्यासाठी काेणीही समाेर येत नव्हते. त्यामुळेच मारहाणीनंतर मी तासन््तास बेशुद्ध हाेऊन पडलेली असायची. मारहाणीदरम्यान पती माझ्या ताेंडावर उशी ठेवायचा. म्हणजे माझा श्वास पूर्णपणे बंद व्हावा. मात्र, मी काहीसा प्रतिकार करून त्याचा हा प्रयत्न हाणुन पाडत हाेती. त्यामुळे ताे रागाने माझ्या सर्व सामन्यांची नासधुस करत हाेता. या साऱ्या गाेष्टी मला राेज सहन कराव्या लागत हाेत्या. एके दिवशी तर त्याने मर्यादाच अाेलांडली. त्याने थेट माझ्यावर चाकूचा हल्ला चढवला. तसेच अाईला मारहाण हाेत असल्याने मुलांचा भितीने थरकाप उडायचा. चाकुने मारहाण हाेत असल्याचे पाहून मुले मध्यस्थीसाठी समाेर अाले. तर, त्याने त्याच्यावरही हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र, यातून मी मुलांना अाणि मला वाचवले. एके दिवशी संधी साधून मी घरातून पळ काढले. कायमचे ते पतीचे घर साेडले. असे केल्यानंतर मुलांसाेबत कुठे राहायचे, हा माेठा प्रश्न माझ्यासमाेर उभा राहिला. मात्र, यावरही मी मात केली. अाज मी अाणि मुले ही अानंदाने साेबत राहत अाहे. काेणत्याही भीतीशिवाय. सहा वर्षापर्वीच्या या घटनेने मला बरेच काही शिकवले. कठीण परिस्थतीवर मात करण्याची शिकवण यातून मला मिळाली। 


रॉलिंग्सची २०१० मध्ये हयाटसाेबत भेट झाली. यातून ते दाेघेही जवळ अाले. त्यांच्यात जवळीकता वाढली. मात्र, त्यानंतर त्याने अापले खरे रुप दाखवले. त्याने तिचा छळ करण्यास सुरुवात केली. ताेही व्यावसायिक बाॅक्सर हाेता. त्यामुळे ताे जबरदस्त पंच मारून मला जखमी करत हाेता. त्यामुळे यातून सुटका करणे माझ्यासाठी कठीण असायचे. अखेर मी त्याच्याच मार्गाची निवड केली. बाॅक्सिंगचे प्रशिक्षण घेतले. अाता वर्ल्ड चॅम्पियन हाेण्याचा पल्ला मला गाठता अाला. 

 

बेक रॉलिंग्स ही बेयर-नकल बॉक्सिंगच्या फ्लायवेट गटात अव्वल 
रॉलिंग्स नित्यनेमाने दिवसभरात करते ३ ते ४ तास कसून सराव रॉलिंग्स राेज नित्यनेमाने तीन ते चार तास कसून सराव करते. यासाठी ती पहाटे उठून तीन किमी रनिंग करते. त्यानंतर मुलांना शाळेत साेडून घरी परत येते. मिळालेल्या वेळेत ती जीममध्ये जाऊन दाेन तास ट्रेनिंग कते. सुटीच्या दिवशी तिची दाेन्ही मुलेही जिममध्ये साेबत येतात. त्यांनाही यातून प्राेत्साहन मिळत अाहे. 
 

बातम्या आणखी आहेत...