Home | National | Delhi | RBI has not asked for money: Center clarifies

रिझर्व्ह बँकेला पैसे मागितले नाहीत : केंद्राचे स्पष्टीकरण

​वृत्तसंस्था | Update - Nov 10, 2018, 08:15 AM IST

सरकार आणि रिझर्व्ह बँकेदरम्यान सध्या सुरु असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर गर्ग यांचे हे वक्तव्य सामोपचाराचे संकेत

  • RBI has not asked for money: Center clarifies

    नवी दिल्ली - सरकारने रिझर्व्ह बँकेला पैसे वळते करण्यास सांगितल्याच्या वृत्ताचा केंद्रीय अर्थ व्यवहार सचिव सुभाष चंद्र गर्ग यांनी इन्कार केला आहे. शुक्रवारी त्यांनी ट्वीट केले की, माध्यमांमध्ये बऱ्याच उलट-सुलट बातम्या येत आहेत. सरकारची आर्थिक तूट अंदाज वर्तवला होता, त्याच्या मर्यादेतच आहे. सरकारने रिझर्व्ह बँकेला १ लाख किंवा ३.६ लाख कोटी रुपये वळते करण्यास सांगितले नाही. सरकार आणि रिझर्व्ह बँकेदरम्यान सध्या सुरु असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर गर्ग यांचे हे वक्तव्य सामोपचाराचे संकेत मानले जात आहेत.

    पैसे वळते करण्याच्या मुद्द्यावरूनच दोन्ही पक्षांत तनातनी सुरू झाली, असेच आतापर्यंत समजले जात होते. आपातकालीन निधी आणि रिझर्व्ह निधी किती असावा, हे निश्चित करणाऱ्या धोरणावर आमची रिझर्व्ह बँकेसोबत चर्चा सुरू होती. बँकेने आपल्या २०१५-१६च्या अहवालात या बाबीचा उल्लेख केला आहे. ३१ मार्च २०१९ ला संपणाऱ्या वर्षात वित्तीय तूट ३.३ टक्के इतकीच असणार आहे. २०१३-१४ मध्ये ती ५.१ टक्के होती. २०१४-१५ पासून ती कमी करण्यात सरकारला यश येत असल्याचे ते म्हणाले.

Trending