Home | Business | Business Special | RBI made a rule that Banks liable to pay Rs 100 per day in case of a failed ATM transaction

जाणून घ्या तुमचा अधिकार : एटीएममधून पैसे निघाले नाही पण खात्यातून कट झाले तर तुम्हाला बँकेकडून 100 रूपये प्रतिदिन नुकसान भरपाई वसूल करण्याचा आहे अधिकार, खुद्द आरबीआयने बनवला नियम; भरपाई देणे नाकारू शकत नाही बँक

दिव्य मराठी वेब टीम | Update - Apr 13, 2019, 01:06 PM IST

आरबीआयने तयार केला 7 दिवसांचा नियम, ग्राहकाने फॉर्म भरताच मिळते नुकसान भरपाई

 • RBI made a rule that Banks liable to pay Rs 100 per day in case of a failed ATM transaction

  फीचर डेस्क - अनेकवेळा एटीएममधून पैसे काढताना पैसे निघत नाहीत पण आपल्या खात्यातून मात्र पैसे कट होतात. आरबीआयच्या नियमानुसार असे झाल्यास 7 दिवसांच्या आत ग्राहकाच्या खात्यात पैसे परत पोहोचले पाहिजे. बँकेने जर असे केले नाही, तर ग्राहकाला या असुविधेबद्दल नुकसान भरपाई द्यावी लागते.

  जाणून घ्या आहे पूर्ण नियम

  दररोज द्यावा लागेल 100 रूपये नुकसान भरपाई

  - खातेदाराने तक्रार दाखल केल्याच्या 7 दिवसांच्या आत बँक ग्राहकाच्या खात्यात पैसे टाकत नसतील तर बँकेने संबंधित ग्राहकाला दररोज 100 नुकसान भरपाई देणे आवश्यक आहे.

  - असे झाल्यास ग्राहकाने तत्काळ बँक शाखेत संपर्क साधून तक्रार द्यावी.

  बँकिंग लोकपालकडे करू शकतो अर्ज

  - बँकेने 30 दिवसांच्या आत तुमच्या तक्रारीवर कारवाई केली नाही तर तुम्ही थेट बँकिंग लोकपालकडे याची तक्रार करू शकता.

  - तुम्हाला ट्रांजेक्शनची पावती किंवा अकाउंट स्टेटमेंटसोबत तुमचा तक्रार अर्ज सादर करावा लागेल. 7 दिवसांच्या आत तुमचे पैसे परत न मिळाल्यास तुम्हाला एनेक्शर-5 फॉर्म भरावा लागेल. ज्या दिवशी हा फॉर्म भरण्यात येईल त्या दिवसापासून तुम्हाला नुकसान भरपाई मिळेल.

Trending