आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाढलेल्या महागाई दरात व्याज दरात कपात करू शकते रिझर्व्ह बँक

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - देशात महागाई दर वाढलेला असतानादेखील रिझर्व्ह बँक डिसेंबर महिन्यामध्ये होणाऱ्या आढावा बैठकीमध्ये व्याजदरात कपात करू शकते, असा अंदाज अर्थतज्ञांनी व्यक्त केला आहे. काही तज्ञांनी अर्थव्यवस्थेच्या सद्य:स्थितीवर प्रश्न उपस्थित केले आहेत. महागाई दर जास्त आणि विकास दर कमी, अशा स्थितीत अर्थव्यवस्था जाणार नाही ना, अशी भीती तज्ञांनी व्यक्त केली आहे. गेल्या सोमवारी जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार सप्टेंबर महिन्यात महागाई दर ३.९९ टक्क्यांवर पोहोचला आहे. ऑगस्टमध्ये हा दर ३.३ टक्के होता. रिझर्व्ह बँकेने ४ टक्के महागाई दराचे लक्ष्य ठेवले आहे. या धोरणानुसार सध्याचा दर रिझर्व्ह बँकेच्या लक्ष्यापेक्षा कमी आहे. यामुळे व्याज दरात कपात होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तज्ञांच्या मते, खाद्यपदार्थ आणि विशेषत: कांद्याचे भाव वाढल्यामुळे महागाई दर वाढला आहे. फक्त कांद्यामुळे महागाई दरात ०.४३ % वाढ झालेली आहे. बँक ऑफ अमेरिका मेरिल लिंचमधील अर्थशास्त्रज्ञांनी याबाबत मतप्रदर्शन केले. त्यांच्या म्हणण्यानुसार, महागाई दरात अचानक झालेली वाढ ही तात्पुरत्या स्वरूपातील आहे. हा दर ऑक्टोबरमध्ये ४.६ टक्क्यांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर हा दर कमी होऊ शकतो. यामुळे रिझर्व्ह बँक दरकपात कायम ठेवू शकते.

बातम्या आणखी आहेत...