आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रिझर्व्ह बँकेकडून रेपाे दरात कपात शक्य, मात्र बँकिंग क्षेत्राचे आव्हान

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - रिझर्व्ह बँक आज पुन्हा एकदा आपल्या पतधाेरण आढाव्यात रेपो दरात कपात करण्याचा निर्णय घेऊ शकते. अर्थव्यवस्थेत जास्तीत जास्त रोकड उपलब्ध करण्याच्या प्रयत्नात सरकारकडून ही अपेक्षा केली जात आहे. महागाई नियंत्रणात ठेवण्यासाठीही अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. 

या वर्षी रिझर्व्ह बँकेने आतापर्यंत चार वेळा रेपो दरात कपात केली आहे. उद्या कपात केल्यास ती पाचवी असेल. तज्ञांच्या माहितीनुसार शुक्रवारी आरबीआय आपल्या रेपो दरात पाव टक्क्याची कपात करू शकते. ऑगस्टमध्ये  रेपो दरात ०.३५% कपात केली. रेपो दर पाहूनच रिझर्व्ह बँक बँकांना कर्ज पुरवठा करते. बँकांना मिळणाऱ्या कर्जाचा दर कमी झाल्यास ग्राहकांना बँकेतून मिळणाऱ्या कर्जावरील व्याजात कपातीस बँका समर्थ असतील. 
 

०.४०% अंकापर्यत कपात शक्य
येस बँकेच्या अर्थतज्ञ युविका ओबरॉय यांच्यानुसार महागाई दर असाच राहिला तर अर्थव्यवस्थेत वाढ करण्यासाठी आरबीआय ०.४०% पर्यंत अंकाची कपात करू शकते. तज्ञांच्या मतानुसार येणाऱ्या डिसेंबर महिन्यात आरबीआय रेपो दरात कपात करू शकते. अर्थव्यवस्थेचा विकास दर जून तिमाहित ५ % वर आला आहे. जो २०१३ नंतर आतापर्यंतचा सर्वात कमी आहे.
 

रेपो दरात आणखी कपातीमुळे कर्ज दरांतील कपातीसोबत आणखी खर्चातही वाढ शक्य
नरेडकोचे अध्यक्ष आणि हीरानंदानी ग्रुपचे सीएमडी निरंजन हिरानंदानी यांच्यानुसार आरबीआय केवळ महागाईवर नियंत्रण आणण्यासह अर्थव्यवस्था बळकट करत नाही. ते म्हणाले, आम्ही रेपो दरात अर्धा टक्का कपात करण्याची अपेक्षा करत आहोत. कारण महागाई दर ३.२ संभाव्य दरापेक्षाही कमी आहे. रेपो दरातील कपातीने कर्जाचे दरच नव्हे तर गुंतवणूक आणि विक्रीत वाढ होऊ शकते. बाजारात रोखीचे व्यवहार वाढतील. नवीन गृहकर्जाला रेपो दराशी लिंक केल्यानंतर रेपो दरात कपात झाल्यास घर खरेदी करणाऱ्या ग्राहकांना दिलासा मिळेल,घरांची मागणीही वाढेल. 

बँकींग सिस्टिम सुरक्षित : रिझर्व्ह बँक 
काही दिवसापूर्वीच रिझर्व्ह बँकेने बँकिंग सिस्टिम सुरक्षित आणि स्थिर असल्याचे म्हटले होते. नुकतीच आरबीआयने पीएमसी बँकेच्या खातेधारकांवर पैसे काढण्यास बंदी आणली हाेती. बँकिंग क्षेत्रातील सध्याच्या ट्रेंडमुळे आरबीआयवर काही प्रमाणावर दबाव वाढत आहे. पीएमसी, लक्ष्मी विलास बँक, इंडियाबुल्ससह काही वित्तीय संस्था अडचणीत आहेत.

बातम्या आणखी आहेत...