आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरबीआयने 0.25% नी घटवला रेपो रेट, 30 लाखांच्या गृहकर्जावर दर महिन्याला होणार 474 रूपयांची बचत

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - भारतीय रिझर्व्ह बँकेच्या मॉनेटरी पॉलिस कमिटी(एमपीसी)ने गुरुवारी व्याज दरांची घोषणा केली. यावेळी रेपो रेटमध्ये 0.25% घट करण्यात आली आहे. यामुळे रेपो रेट 6% वरून 5.75% टक्के झाला आहे. पण ग्राहकांना रेटो रेटचा फायदा केव्हा आणि किती मिळणार हे बँकांवर अवलंबून आहे. या रेपो रेटवरच आरबीआय व्यावसायिक बँकांना कर्ज देत असते.  


रेपो दर कमी होणे अपेक्षित होते

आर्थिक विकासाचा वेग मंदावल्यामुळे आरबीआयवर व्याज दर कमी करण्याचा दबाव वाढला होता. मार्च तिमाहीत जीडीपीचा विकास दर कमी होऊन 5.8% राहिला. तर 2018-19 या संपूर्ण वर्षात विकास दर 6.8% होता. गेल्या पाच वर्षांतील सर्वांत कमी विकास दर आहे. अशातच स्वस्त कर्जाद्वारे बाजारात व्यवहार वाढवून अर्थव्यवस्थेचा वेग वाढवण्याचा राष्ट्रीयकृत बँकांचा प्रयत्न आहे. 

 

20 लाखांच्या गृहकर्जावर लागणार ईएमआय

कर्ज रक्कमजुना ईएमआय दरनवीन ईएमआय दर दर महिन्याची बचत
20 लाख 17,483 रूपये 17,167 रूपये     316 रूपये
30 लाख26,225 रूपये25,751 रूपये474 रुपये
50 लाख44,505 रूपये43,708 रूपये797 रूपये

 

> 30 लाखांपर्यंतच्या कर्जावरील जुना दर 8.60% आणि नवीन दर 8.35% च्या आधारावर गणना
> 50 लाखांपर्यंतच्या कर्जावरील जुना दर 8.85% आणि नवीन दर 8.60% च्या आधारावर गणना
> बँक देखील व्याजदरात 0.25% कपता केली तर नवीन दरांवर केलेली गणना लागून होणार

 

पाच वर्षांच्या कार लोनसाठी लागणार ईएमआय

कर्ज रक्कमजुना ईएमआयनवा ईएमआय दरदर महिन्याला बचत
3 लाख6,286 रूपये6,249 रूपये37 रूपये
5 लाख10,477 रूपये10,416 रूपये61 रूपये
10 लाख20,953 रूपये20,831 रूपये122 रूपये

(जुना व्याजदर 9.40% आणि नवीन दर 9.15%च्या आधारावर गणना)
बँकांनी व्याज दरात 0.25% कपात केल्यावरच ईएमआयमध्ये कपात होणार