आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
नवी दिल्ली - भारतीय रिझर्व्ह बँकेने 2017 नंतर प्रथमच रेपो रेटमध्ये पाव टक्क्यांची कपात करत असल्याची घोषणा केली आहे. आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्या अध्यक्षतेखालील सहा सदस्यीय नाणेनिधी धोरण समितीने (एमपीसी) रेपो रेट 0.25 टक्क्यांनी कमी केला. 6 पैकी 4 सदस्यांनी रेपो रेट कमी करण्याच्या समर्थनात मत दिले असून आता रेपो रेट 6.25 झाला आहे. यापूर्वी हा दर ऑगस्ट 2017 मध्ये कमी करण्यात आला होता. या निर्णयामुळे आपल्या होम लोन, ऑटो लोन आणि इतर कर्जांचा ईएमआय स्वस्त होऊ शकतात.
आउटलुक केले न्युट्रल
आरबीआय मॉनेटरी पॉलिसीच्या सर्वच सदस्यांनी व्याज दरांवर आउटलुक सक्तीने (कॅलिब्रेटिंग टायटनिंग) न्यूट्रल करण्याचा निर्णय घेतला आहे. अर्थात यापुढे सुद्धा व्याज दर कमी होण्याची शक्यता राहील. आरबीआयने मार्च त्रैमासिकासाठी महागाई दराचा अंदाज कमी करून 2.8% केला आहे. येत्या आर्थिक वर्षात (2019-20) प्रथमच सहामाही महागाई दर 3.2% वरून 3.4% राहण्याचा अंदाज आहे. येत्या आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या त्रैमासिकात महागाई दर 3.9% राहणार असा अंदाज लावण्यात आला आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.