आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

New Currency Note: आरबीआय जारी करणार हिरव्या-पिवळ्या रंगाची 20 रुपयांची नवी नोट

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - आरबीआय लवकरच देशभर 20 रुपयांचा नवा नोट जारी करणार आहे. रिझर्व्ह बँकेने शुक्रवारी एका नोटीफिकेशनमध्ये ही माहिती दिली. हिरव्या-पिवळ्या रंगाचा हा नोट महात्मा गांधी सिरीझचाच आहे. त्यावर रिझर्व्ह बँकेचे नवे गव्हर्नर शक्तिकांत दास यांची स्वाक्षरी आहे. नवीन नोटाचा आकार 63x129 एमएम आहे. नोटच्या मागच्या बाजूला वेरुळच्या गुफा छापल्या आहेत. नवीन नोट मार्केट आल्यानंतरही 20 रुपयांचा जुना चलनी नोट बाद होणार नाही असे आरबीआयने स्पष्ट केले आहे.


नोटाच्या दोन्ही बाजूंनी फुलांची डिझाइन असलेले प्रिन्ट आहे. तसेच मध्यभागी महात्मा गांधी यांचा फोटो आहे. 20 हा अंक देवनागरी भाषेत प्रिन्ट करण्यात आला आहे. सुरक्षा बँडवर हिन्दीमध्ये भारत आरबीआय असेही लिहिण्यात आले आहे. नोटाच्या समोरील भागावर वर आणि खालच्या बाजूला छोट्या आणि मोठ्या आकारात चढत्या क्रमाने संकेत देण्यात आले आहेत. मागच्या बाजूला डावीकडे स्वच्छ भारत अभियानचा लोगो सुद्धा आहे.

बातम्या आणखी आहेत...