आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

RBI ने आणले दृष्टीहीन व्यक्तिंसाठी नवीन तंत्रज्ञान, हे डिवाइस हिंदी आणि इंग्रजीत देईल नोटांची माहिती...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- रिजर्व बँक ऑफ इंडिया देशाच्या अंदाजे 80 लाख दृ्ष्टीहीन व्यक्तिंसाठी नवीन भेट आणली आहे. बँक अशा मोबाइल फोन आधारित सॉल्यूशनवर काम करत आहे, ज्यामुळे दृष्टीहीनही लगेच कोणती नोट आहे हे सांगु शकतील. सध्या 100 आणि त्यावरूल रूपयांच्या नोटांवर प्रिंटिंग बेस्ड आयडेंटिफिकेशन मार्क आहे, ज्यामुळे दृष्टीहीन लोक नोटेला ओळखु शकतात. पण बाजारात असलेल्या 10, 20, 50 च्या नोटांमध्ये ही सुविधा नाहीये. जून, 2018 मध्ये रिजर्व बँकेने घोषणा केली होती की, ते दृष्टिहीन लोकांसाठी नवीन मॅकेनिज्म डेवलप करणार आहे ज्यामुळे नोटेला ओळखु शकतील.

 
2 सेकंदात मिळेल नोटेची माहिती
आता अरबीआयने अशा संस्था आणि कंपन्यासाठी वेंडर उघडले आहे, जी असे डिवाइस बनवण्यासाठी मदत करू शकतील. RBI नुसार हे डिवाइस किंवा मॅकेनिज्म असे असावे की, त्याच्या जवळ नोट नेताच ते नोट कोणती आहे याची माहिती देईल.

 
ऑफलाइनमध्येही करेल काम
आरबीआयने डिवाइस साठी ही अट ठेवली आहे की, हे डिवाइस ऑफलाइन मोडमध्येही काम केले पाहिजे. हे सॉल्यूशन पूर्ण सॉफ्टवेयर आधारित असू शकते, किंवा मोबाईलवरही चालेल. हार्डवेयर बेस सॉल्यूशनमध्ये डिवाइसमध्ये बॅटरी असली पाहिजे, ते रिचार्जेबल असावे.

 
खरी किंवा खोट्याची नाही होणार ओळख
आरबीआयने आपल्या टेंडर डॉक्यूमेंटमध्ये लिहीले आहे की, या डिवाइस नोट खरी आहे की खोटी याची माहिती देणार नाही.

 

बातम्या आणखी आहेत...