आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बँकेत रोज होत आहेत 5 फ्रॉडची प्रकरणे, असे वापस मिळवा आपले गेलेले पैसे...

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली-  बँकेत सायबर फ्रॉडची प्रकरणे वाढतच आहेत. भारतीय रिझर्व बँकेच्या रिपोर्टनुसार 2017-18 मध्ये सायबर फ्रॉडचे एकुण 2,069 प्रकरणे समोर आली आहे. या प्रकरणात 109.5 कोटी रूपयांचा फ्रॉड झाला आहे. तर 2016-17 मध्ये बँकेत साइयबर फ्रॉडचे एकुण 1,372 प्रकरणे समोर आली आहेत. या सगळ्यात 42 कोटींचा फ्रॉड झाला आहे. जर तुमच्यासोबत एखाद्या प्रकारचा फ्रॉड झाला तर बँक तुमचे नुकसान भरून देईल का, याबद्दल रिझर्व बँकेने नियम काही नियम बनवले आहेत. जाणून घ्या हे नवीन नियम.


बँकेला 3 दिवसांत द्या फ्रॉडची माहिती 
रिझर्व बँकेच्या सर्कूलरनुसार जर तुमच्या बँक अकाउंटमधून अनधिकृत ट्रांझॅक्‍शन किंवा फ्रॉड झाला तर तुम्हाला 3 दिवसांच्या आत बँकेला याची माहिती द्यायची आहे. जर तुम्ही असे केले तर तुमची झिरो लायबिलिटी होईल. जर हे ट्रांझॅक्शन बँकेकडून नसेल झाले तर तुम्हाला तुमचे सगळे पैसे परत मिळतील.

 
4 ते 7 दिवसांत माहिती दिली तर तुमची लिमिटेड लायबिलिटी असेल
जर तुमच्या अकाउंटमध्ये अनधिकृत ट्रांझॅक्‍शन किंवा फ्रॉड झाला असेल आणि तम्ही याची माहिती 4 ते 7 दिवसांत दिला तर तुम्हाला याची लिमीटेड लायबिलीटी मिळल. 
 

जर बँक अकाउंट बेसिक सेव्हिंग बँकिंग डिपॉजिट अकाउंट म्हणजेच झिरो बॅलेंस अकाउंट आहे तर तुमची लायबिलिटी 5,000 रुपए असेल. म्हणजे तुमच्या बँक अकाउंटमधून 10,000 रूपयांचे अनधिकृत ट्रांझॅक्‍शन झाले तर तुम्हाला बँकेकडून 5,000 रूपये परत मिळतील. बाकी 5 हजार रूपयांचे नुकसान होईल.


सेव्हिंग अकाउंटवर कस्‍टमरची लायबिलिटी असेल 10,000
जर तुमचे सेव्हिंग अकाउंट आहे आणि तुमच्या अकाउंटमधून अनधिकृत ट्रांझॅक्‍शन झाले असेल तर तुमची लायबिलिटी 10,000 रूपये असेल. म्हणजे तुमच्या अकाउंटमधून 20,000 रूपयांचे अनधिकृत ट्रांझॅक्‍शन झाले असेल तर बँकेतून तुम्हाला 10,000 रूपये परत मिळतील.

 
करंट अकाउंट आणि क्रेडिट कार्डवर किती असेल लायबिलिटी 
जर तुमचे करंट अकाउंट किंवा 5 लाख रूपयांपेक्षा जास्ती लिमिटच्या क्रेडिट कार्डवरून अनधिकृत ट्रांझॅक्‍शन झाला असेल तर अशा प्रकरणात तुमची लायबिलिटी 25,000 रूपये असेल.