बंगळुरूच्या पराभवाची मालिका सुरुच; दिल्ली विरूद्ध सलग सहावा पराभव

वृत्तसंस्था

Apr 08,2019 08:58:00 AM IST

बंगळुरू - विराट काेहलीला राॅयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला पराभवांची मालिका खंडित करता आली नाही. त्यामुळे यजमान बंगळुरूच्या टीमला यंदाच्या १२ व्या सत्राच्या आयपीएलमध्ये सलग सहाव्या सामन्यात पराभवाला सामाेरे जावे लागले. त्यामुळे आयपीएलमध्ये सहा वर्षानंतर काेण्या टीमने सुरुवातीचे सहा सामने गमावले. यासह विराट काेहलीच्या नावे एका वेगळ्याच कामगिरीची नाेंद झाली. ताे आता सर्वाधिक पराभवांच्या यादीमध्ये अव्वल स्थानावर आला आहे. त्याच्या नावे आता सर्वाधिक ८६ पराभवांची नाेेंद झाली. यामध्ये त्याने काेलकात्याच्या राॅबिन उथप्पाला (८५ ) मागे टाकले.


श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली दिल्ली कॅपिटल्स संघाने सरस खेळी करताना ४ गड्यांनी सामना जिंकला. यासह दिल्लीला तिसऱ्या विजयाची नाेंद करता आली. बंगळुरू संघाने प्रथम फलंदाजी करताना ८ गड्यांच्या माेबदल्यात दिल्लीसमाेेर १५० धावांचे लक्ष्य ठेवले हाेते. प्रत्युत्तरात दिल्लीने ६ गडी गमावून १८.५ षटकांत विजयश्री खेचून आणली. श्रेयस अय्यरने (६७) अर्धशतकी खेळी करताना संघाचा शानदार विजय निश्चित केला. या विजयासह दिल्लीने अाता गुणतालिकेमध्ये पाचव्या स्थानावर धडक मारली आहे.
हीच लय कायम ठेवताना दिल्ली संघ १२ एप्रिल राेजी काेलकात्याच्या आव्हानाचा सामना करेल.

X
COMMENT