आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देशातील वाद देशातच सोडवावा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गुजरातच्या पाटीदार समाजाने आरक्षणासाठी आंदोलन सुरू केले आहे. हार्दिक पटेल या तरुणाच्या नेतृत्वाखाली जवळपास १० लाख लोकांनी अहमदाबादमध्ये आंदोलन केले. वास्तविक पटेल समाज सर्वच बाबतीत अग्रेसर असतानाही जातीच्या उतरंडीवर खालच्या क्रमांकावर जाण्यास तयार झाला. ही अधोगतीच आहे. केवळ संख्येच्या बळावर आर्थिक संपन्न असतानाही अनावश्यक मागणी करणे म्हणजे देशात वर्गकलह निर्माण करणे होय. असे कृत्य म्हणजे देशद्रोहच आहे. लोकशाही असल्यामुळे कुणीही निवडणुकीचा धाक दाखवून सत्ताधाऱ्यांवर दबाव आणताना दिसतात. पटेल समाजाने तर कहरच केला आहे. या समाजाचे अमेरिकेतील नागरिक पंतप्रधान मोदींना त्या देशात विरोध करणार आहेत. घरातील भांडणे घरातच मिटवण्याऐवजी ती परदेशात नेऊन तेथील भारतीय नागरिकांतही वर्गकलह निर्माण करणे कितपत योग्य आहे? पाटीदार समाजाने या देशद्रोही कृत्यात सहभागी होऊ नये एवढीच अपेक्षा. तसेच परदेशात पंतप्रधानांना विरोध करणाऱ्यांना संकटकाळी देश का आठवतो व आपले सरकारही त्यांना स्वखर्चाने स्वदेशात आणण्याचा खर्च का करते, याचा विचार व्हावा.