आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारत-पाकिस्तान मॅचमध्ये भारतीय चाहत्यांनी शोएब मलिकला म्हटले 'जिजू', त्याने दिली अशी प्रतिक्रिया

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पोर्ट्स डेस्क - आशिया चषकातील सुपर फोरच्या साखळी सामन्यात रविवारी भारताने पाकिस्तानचा 9 विकेट राखून धुव्वा उडवला. भारतीय गोलंदाजांनी पाकिस्तानच्या फलंदाजांची चांगलीच त्रेधातिरपीट उडवली. मात्र भारता विरोधातील दोन्ही सामन्यात भारताचा जावई शोएब मलिकने चांगली फलंदाजी केली. रविवारच्या सामन्यातही शोएबने 78 धावा केल्या. पण रोहित आणि शिखरच्या फटकेबाजीमुळे त्याची मेहनत वाया गेली. शोएब या मॅचमध्ये चांगला खेळलाच पण त्याचबरोबर तो आणखी एका गोष्टीसाठी सर्वांच्या लक्षात राहिला. ती म्हणजे त्याला जिजू म्हणाऱ्या फॅन्सला त्याने तिलेल्या प्रतिसादामुळे. 


नेमके काय झाले...
पाकिस्तानची गोलंदाजी सुरू असताना शोएम सीमारेषेच्या जवळ फिल्डींग करत होता. त्याचवेळी त्याच्या मागच्या बाजुला काही चाहते होते. हे भारतीय चाहते शोएबला जिजू जिजू म्हणून चिडवत होते. त्यांनी शोएबला दोन तीन वेळा जिजू जिजू म्हणून हाक मारला. काही वेळाने शोएबने त्यांच्याकडे पाहिले आणि त्यांना हात हलवून स्माइल दिले. शोएबच्या या वागण्यामुळे भारतीय चाहतेही त्याचे कौतुक करत आहेत. ट्विटरवर एका अकाऊंटवर हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला. चला पाहुयात हा व्हिडिओ..

Ok.. That was nice.. #ShoaibMalik
"Jeeju".. 😜 pic.twitter.com/5eZw2GQY7L

— Lady Nisha (@Lady_nishaaa) September 23, 2018

बातम्या आणखी आहेत...