आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अजित पवार यांनी खंजीर खुपसला, रात्रीच्या अंधारातील हे पाप; आता या लाेकांना जनताच धडा शिकवेल : संजय राऊत

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - काॅंग्रेस- राष्ट्रवादीला साेबत घेऊन शिवसेनेचाच मुख्यमंत्री बनवण्याच्या रणनिती अग्रभागी असलेले शिवसेनेचे खासदार संजय राऊत भाजपच्या खेळीमुळे ताेंडघशी पडले आहेत. ‘भाजप सत्तेसाठी काहीही करु शकते. परंतु अजित पवारांनी महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसला आहे,’ अशी पहिली प्रतिक्रिया राऊत यांनी पत्रकारांशी बाेलताना दिली. शनिवारी सकाळी भाजपचे देवेंद्र फडणवीस व राष्ट्रवादीचे अजित पवार यांना अनुक्रमे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्याचे वृत्त येताच त्याचा सर्वाधिक धक्का बसला ताे शिवसेनेला आणि खासदार संजय राऊतांना. पत्रकारांशी बाेलताना खासदार राऊत म्हणाले, ‘काॅंग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनेच्या नेत्यांची शुक्रवारी बैठक सुरु असताना रात्री नऊ वाजेपर्यंत अजित पवार आमच्यासाेबत हाेते. मात्र त्यांची देहबोली सुरुवातीपासूनच संशयास्पद होती. हे आमच्याही लक्षात येत हाेते. कदाचित शरद पवारांच्याही ते लक्षात आले असावे. काही वेळाने ते बैठकीतून निघून गेले व नंतर त्यांचा फाेन बंद लागत हाेता. एक मात्र मी ठामपणे सांगताे या सगळ्या घडामोडींशी शरद पवारांचा कोणताही संबंध नाही.’

रात्रीच्या अंधारातील हे पाप; आता या लाेकांना जनताच धडा शिकवेल
भाजपने पैसा आणि सत्तेचा गैरवापर करुन सत्ता स्थापन केली. पैसा आणि सत्तेचा गैरवापर करुन सत्ता मिळवणे हा राजभवनाचा सरळ सरळ अपमान आहे. रात्रीच्या अंधारात चोरुन पाप केलं जातं, दरोडा टाकला जातो. दिवसाढवळ्या, लोकांना आमंत्रित करुन शपथ का घेतली नाही, याचा अर्थ तुम्ही पाप केलं असा होतं. याची किंमत चुकवावी लागेल. राज्यातील जनता या लाेकांना धडा शिकवेल,’ असा इशाराही खासदार संजय राऊत यांनी भाजपला दिला.

बातम्या आणखी आहेत...