आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठा आरक्षण हे सकल मराठा समाजाचे यश, एकमताने निर्णयाचेही सर्व स्तरांतून स्वागत, वाचा कोण काय म्हणाले

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - मराठा समाजाला शैक्षणिक आणि सामाजिक मागास वर्ग म्हणून आरक्षण देणारे विधेयक गुरुवारी विधानसभा आणि विधानपरिषदेत मंजूर करण्यात आले. दोन्हीही सभागृहांमध्ये सर्व सदस्यांनी एकमताने या विधेयकाला पाठिंबा दिलाय. सर्वच स्तरातून या निर्णयाचे स्वागत होताना दिसत आहे. विविध नेत्यांनी यानंतर काय प्रतिक्रिया दिली हे जाणून घेऊयात. 

 

अशोक चव्हाण, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष
सकल मराठा समाजाच्या प्रयत्नांना यश आले. तरुणांची आहुती आणि मराठा क्रांती मोर्चा यांचे यश आहे. मागासवर्गीय आयोगाने अहवाल दिल्याने आरक्षण टिकेल अशी शक्यता वाटते. 


विनोद तावडे, शालेय शिक्षणमंत्री 
भाजप-शिवसेना सरकारने मराठा आरक्षण देऊन आपला शब्द पाळला आहे. या ऐतिहासिक निर्णयाबद्दल मराठा समाज आणि महाराष्ट्र शासनाचे अभिनंदन!

भाजप-शिवसेना सरकारने मराठा आरक्षण देऊन आपला शब्द पाळला आहे. या ऐतिहासिक निर्णयाबद्दल मराठा समाज आणि महाराष्ट्र शासनाचे अभिनंदन!

— Vinod Tawde (@TawdeVinod) November 29, 2018

मराठा आंदोलक 
आझाद मैदानावर उपोषण करणाऱ्या मराठा मोर्चाच्या आंदोलकांनी वकिलांचा सल्ला घेतल्यानंतरच आंदोलन मागे घेणार असल्याचे म्हटले आहे.  तसेच राज्यपालांची सही झाल्याशिवाय आणि मराठा तरुणांवरील गुन्हे मागे घेतल्याशिवाय आंदोलन सुरुच राहणार असल्याचे म्हटले आहे. 

 

रावसाहेब दानवे, भाजप प्रदेशाध्यक्ष 
कोणत्याही समाजाचे आरक्षण न काढता वेगळे 16 टक्के आरक्षण देण्यात आले आहे. त्यामुळे केवळ मराठा समाजच नव्हे तर सर्व समाज आनंदी आहेत. सकल मराठा समाजाचे अभिनंदन आणि शांततामय आंदोलनासाठी आभार. 

 

आदित्य ठाकरे 
मराठा समाजाला आरक्षण मिळण्याची मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित होती. त्यामुळे या निर्णयाचा आनंद आहे. त्यात सर्वांनी याला पाठिंबा दिला याचा अधिक आनंद आहे. 


मधू चव्हाण, भाजप प्रवक्ते 
आज जे झाले ते अत्यांत उत्तम आहे.  समाजावर परिणाम करणारे कायदे करताना अशाचप्रकारे विरोधकांसह सर्वांनी एकत्र येऊन निर्णय घेणे गरजेचे आहे. 

 

 

बातम्या आणखी आहेत...