आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यामुळे CBI ला म्हटले जाते सर्वात पॉवरफुल एजन्सी, जाणून घ्या, सीबीआयला खरंच असतो का कोणाच्याही चौकशीचा अधिकार?

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - देशातील सर्वात शक्तीशाली तपास संस्था सेंट्रल ब्युरो ऑफ इन्वेस्टिगेशन (CBI) मधील अधिकाऱ्यांच्या वादामुळे लाचखोरीचे प्रकरण समोर आले आहे. सीबीआयने बुधवारीही स्वतःच्यात इमारतीत छापा मारला. तसेच वाद असलेल्या प्रमुख दोन अधिकाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठवत नव्या प्रभारी संचालकांची नियुक्तीही केली आहे. 


मीडिया रिपोर्ट्समध्ये दावा केला जात आहे की, सरकार राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांना या प्रकरणाच्या तपासाची जबाबदारी दिली जाऊ शकते. मोदींनी या प्रकरणी नाराजी व्यक्त केली आहे. सीबीआयचे बॉस हे संचालकच असतात. पण सीबीआय केंद्राच्या इशाऱ्यावर काम करते असेही आरोप होतात. पण सीबीआय नेमकी कधी सुरू झाली आणि ती कसे काम करते तिला देशातील सर्वात शक्तीशाली संस्था का म्हणतात, हे आपण आज जाणून घेणार आहोत. 


केंद्राच्या अख्त्यारित करते काम
- सीबीआय थेट केंद्र सरकारच्या अख्त्यारित काम करते. त्यामुळे ही सर्वात शक्तीशाली संस्था असल्याचे म्हटले जाते. राज्य त्यांच्या एखाद्या प्रकरणाच्या सीबीआय चौकशीसाठी केंद्राला विनंती करू शकतात. याबाबत अंतिम निर्णय केंद्राचा असतो. 
- सीबीआयसा केंद्र, हायकोर्ट किंवा सुप्रीम कोर्टाने आदेश दिले तरच ती स्टेट पोलिसांद्वारे रजिस्टर्ड केसबाबत चौकशी करू शकते. डीएसपीई अॅक्टअंतर्गतही सरकार सीबीआयमार्फत चौकशी करू शकते. 
- सीबीआई डायरेक्टरला प्रशासकीय अधिकार असतात पण ते फार जास्त नसतात. म्हणजे ते स्वतः इन्स्पेक्टर लेव्हलच्या वरचे अधिकारी म्हणजे डीएसपी, एसपी, डीआयजी आणि अॅडिशनल डायरेक्टरची बदलीही करू शकत नाहीत. 
- सीबीआय डायरेक्टरची नियुक्ती सर्च कमिटीच्या शिफारसीवरून केली जाते. पंतप्रधान त्याचे अध्यक्ष असतात. त्याशिवाय चीफ जस्टीस ऑफ इंडिया आणि अपोझिशन लीडरचाही यात समावेश असतो. सीबीआय ऑफिसर्सना गणवेशही नसतो. 

 

ब्रिटिश काळात सुरुवात 
- सेंट्रल ब्युरो ऑफ इनव्हेस्टीगेशन (CBI)ची सुरुवात स्पेशल पुलिस एस्टॅब्लिशमेंट (SPE) द्वारे ब्रिटीश काळात झाली होती. भारत सरकारने 1941 मध्ये (ब्रिटिश राज्य) डिपार्टमेंट ऑफ वार अंतर्गत याची स्थापना केली होती. 
- त्याकाळी दुसरे महायुद्ध सुरू होते. तेव्हा एसपीईची प्रमुख जबाबदारी लाच आणि भ्रष्टाचाराच्या प्रकरणांची चौकशी करणे ही होती. सेकंड वर्ल्ड वार संपल्यानंतर एका अशा एजन्सीची गरज व्यक्त करण्यात आली जी लाच आणि भ्रष्टाचारांची चौकशी करेल. 
- त्यानंतर 1946 मध्ये दिल्ली पोलिस एस्टॅब्लिशमेंट अॅक्ट लागू झाला. त्यामुळे एसपीई प्रमुखाला गृह विभागात हलवले आणि त्यांची कामे वाढवली. एसपीईच्या अधिकार क्षेत्रत सर्व युनियन यूनियन टेरिटरीजपर्यंत वाढवले. तसेच राज्यांच्या सहमतीने राज्यांपर्यंत त्याचे अधिकार क्षेत्रही वाढवले जाऊ शकते. 1963 मध्ये याला सीबीआय असे नाव पडले. 


सध्याच्या काळात सीबीआय तीन विभागांत काम करते 
- अँटी करप्शन डिव्हीजन
- इकॉनॉमिक ऑफेंसेस डिव्हीजन
- स्पेशल क्राइम्स डिव्हीजन


1965 पासून वाढले अधिकार 
- 1965 पासून सीबीआयने इकॉनॉमिक ऑफेंसेसबरोबरच मर्डर, किडनॅपिंग, टेररिस्ट क्राइम अशा प्रकरणांचा तपास सुरू केला. 
- 1987 मध्ये अँटी करप्शन आणि और स्पेशल क्राइम्स डिव्हीजनची स्थापना झाली. 
- सीबीआयचे हेड ऑफिस दिल्लीत आहे. ते 18 झोनमध्ये काम करते. 


सीबीआयमध्ये तुम्हीही करू शकता तक्रार 
- सीबीआयच्या कॉन्स्टेबलपासून डायरेक्टर पदापर्यंत ऑफिसर्सना स्पेशल अलाउंस मिळतात 
- सीबीआयमध्ये तक्रार करण्यासाठी तक्रारकर्त्याला ओळख जाहीर करावी लागते. 
- कोणताही व्यक्ती इतरांच्या अवैध संपत्तीबाबत सीबीआयला माहिती देऊ शकते. माहिती खरी आणि पुराव्यांसह असेल तर सीबीआय छापा टाकते. प्रिव्हेंशन ऑफ करप्शन अॅक्ट, 1988 अंतर्गत चुकीच्या पद्धतीने संपत्ती जमवणे गुन्हा आहे. 
- सीबीआयचा स्वतःचे स्ट्राँग इंटर्नल व्हिजिलन्स सेटअप असतो. त्या माध्यमातून सीबीआई सर्वांवर नजर ठेवते. 

बातम्या आणखी आहेत...