आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोण आहे Paytm ब्लॅकमेल केसमध्ये मास्टरमाइंड म्हटली जाणारी सोनिया धवन, वाचा का रचला कट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - पेटीएमच्या विजय शेखर यांना ब्लॅकमेल करण्याच्या प्रकरणामध्ये याच कंपनीच्या व्हीपी सोनिया धवनसह तिघांना अटक केली आहे. पण पोलिसांच्या मते सोनियाच या संपूर्ण प्रकरणाची मास्टर माइंड होती. या संपूर्ण कटामध्ये सहभागी असलेल्या देवेंद्रने सोनियाच्या म्हणण्यानुसारच डेटा कॉपी केला होता, असेही पोलिसांचे मत आहे. 

 

कोण आहे सोनिया.. 
>> सोनियाच्या आजवरच्या करिअरचा विचार करता ती चांगलीच यशस्वी ठरलेली आहे. 
>> अनेक दिवस विजय शेखर यांची सेक्रेटरी म्हणून तिने काम केले. त्यानंतर ती कंपनीची व्हाइस प्रेसिडेंट बनली, 
>> सोनिया 2010 मध्ये पेटीएममध्ये काम करू लागली होती असे समोर आले आहे. त्याआधी तिने काही नामंकित कंपन्यांत मोठ्या पदावर काम केले होते. 
>> मीडिया रिपोर्ट्सनुसार सोनियाचे वार्षिक उत्पन्न 85 लाख रुपये आहे. 


का रचला कट.. 
तपासामध्ये पोलिसांना समजले आहे की, सोनियाला फ्लॅट खरेदी करण्यासाठी 4 कोटी रुपये हवे होते. तिने यासाठी कंपनीकडे मदत मागितली होती. पण तिला मदत मिळाली नाही म्हणून तिने हा कट रचला. सोनियाने कंपनीत काम करणाऱ्या देवेंद्र कुमारलाही या कटात सहभागी करून घेतले. तर तिसरा आरोपी सोनियाचा पती रुपक जैन आहे. 

 

 

बातम्या आणखी आहेत...