आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फ्रिजमध्ये ठेवलेले अन्न खाण्याआधी हे वाचा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आपण आधीच्या रात्रीचे उरलेले अन्न टाकून देत नाही. फ्रिजमध्ये ठेवून ते दुसऱ्या दिवशी गरम करून खाण्याचा विचार असतो. मात्र असे केल्याने पोटदुखी किंवा पोटाचे इन्फेक्शन होण्याचाही धोका असतो. त्यामुळे कोणते अन्नपदार्थ किती दिवस ठेवू शकता याची माहिती जाणून घ्या... जाणून घ्या कोणते पदार्थ किती दिवस ठेवावे

चपाती : घरी बनवलेल्या पोळ्या दोन दिवसांहून जास्त दिवस ठेवू नये. शिवाय पोळ्यांना सुक्या जागी ठेवावे. ओलसर जागी पोळ्या ठेवल्याने त्या खराब होण्याची शक्यता जास्त असते.

भात : जरी भात योग्यरीत्या शिजवलेला असेल तरी त्यामध्ये असणाऱ्या बॅक्टेरियामुळे विषबाधा होण्याची शक्यता असते. एक गोष्ट लक्षात ठेवा की भात खाण्यापूर्वी तो योग्यरीत्या शिजवणे गरजेचे असते. शिजवलेला भात तीन दिवस ठेवता येणे शक्य आहे.

भाजी : शिजवलेल्या भाज्या फ्रिजमध्ये तुम्ही ३-४ दिवस ठेवू शकता. जर तुम्ही भाजी पाच दिवसांपर्यंत ठेवली तर ती खराब होण्याची शक्यता असते. शिवाय त्याला वास येतो आणि चवही बदलते. पावसाळ्याच्या दिवसांत अशा भाज्या खाऊ नये, तर ज्या भाज्यांमध्ये कांदा किंवा पनीर असतो त्या भाज्या तातडीने संपवाव्या.

चिकन किंवा मांस : उरलेले चिकन किंवा मांस तीन दिवसांपेक्षा जास्त दिवस ठेवू नये. शिवाय हे बनवताना योग्य पद्धतीने तयार करणे फार गरजेचे आहे. मांस किंवा चिकन पुन्हा खाताना ते गरम करून खावे.

दुग्धजन्य पदार्थ : दही, दूध किंवा क्रिम या पदार्थांचं पॅकिंग एकदा उघडल्यानंतर पुन्ही नीट बंद करून तातडीने फ्रिजमध्ये ठेवावं. चिंचसारखे पदार्थ एक महिन्यापर्यंत राहू शकतात. पण क्रीम किंवा दूध पाच दिवसांपेक्षा जास्त दिवस ठेवू नये.

बातम्या आणखी आहेत...