आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

CBI मध्ये भूकंप आणणारा मांस व्यापारी मोइन कुरेशी नेमका आहे कोण.. असा बनला सामान्य व्यापारी ते कोट्यधीश

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - देशातील सर्वात मोठी तपास संस्था असलेल्या सीबीआयमध्ये सद्या भूकंप आलेला आहे. सीबीआयच्या दोन मोठ्या अधिकाऱ्यांमधील वाद आणि लाचखोरीचे प्रकरण समोर आले आहे. त्यानंतर या अधिकाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठवले आहे. पण या संपूर्ण प्रकरणामध्ये एका व्यक्तीचे नाव वारंवार समोर येत आहे, ते म्हणजे मांस व्यापारी मोइन कुरेशी. खऱ्या अर्थाने त्याच्यामुळेच हे सर्व प्रकरण समोर आले. त्याच्याशी जवळीक ठेवल्यामुळे सीबीआयच्या तीन अधिकाऱ्यांना कारवाईला सामोरे जावे लागले आहे. हा मोइन कुरेशी नेमका आहे तरी कोण हे जाणून घेऊयात. 

 

कोण आहे मोइन कुरेशी..
>> मोइन कुरेशीचा संबध उत्तर प्रदेशातील रामपूरशी आहे. 
>> कुरेशीने 1993 मध्ये रामपूरमध्ये अगदी छोट्या पातळीवर मांस व्यवसाय सुरू केला होता. 
>> त्याने रामपूरमध्ये एक कत्तलखाना सुरू केला होता. पण हळू हळू तो मोठा मांस व्यापारी बनला.  
>> कुरेशीचे नाव 2014 मध्ये सर्वात आधी प्रकाशझोतात आले. त्यावेळी इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने दिल्‍ली, रामपूरसह त्याच्या इतर ठिकाणी असलेल्या प्रॉपर्टीजवर छापे मारले होते. 
>> त्यावेळी काँग्रेसच्या नेत्यांशी त्याचे जवळचे संबंध असल्याचे आरोपही लागले होते. 
>> सीबीआयचे माजी प्रमुख एपी सिंह आणि रंजीत सिन्‍हा यांच्याशीही त्याचे जवळचे संबंध होते असे म्हटले जाते. 
>> गेल्या वर्षीच कुरेशीला मदत केल्याच्या आरोपात सीबीआयचे माजी प्रमूख एपी सिंह यांच्यावर खटला दाखल करण्यात आला होता. 
>> कुरेशीच्या विरोधात कर चुकवेगिरी, फसवणूक, मनी लाँडरींग आणि हेराफेरीची अनेक प्रकरणे सुरू आहेत. 
>> 2011 मध्ये कुरेशीची मुलगी पर्नियाच्या लग्नात कोट्यवधी रुपये उडवल्याचा आरोप झाला होता. त्या लग्नात पाकिस्तानी गायक राहत फतेह अली खान यांना गाण्यासाठी बोलवले होते. ते प्रकरण गाजले होते. कारण त्यांना परतताना अडवण्यात आले होते. 
>> कुरेशी यांचे वडील मुंशी माजीद कुरेशी हे अफूचा व्यवसाय करायचे असेही म्हटले जाते. 

बातम्या आणखी आहेत...