आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ही तर नेटिझन्सची मुस्कटदाबी..!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
"नॅशनल डाटा एन्क्रिप्शन पॉलिसी’च्या सोमवारी जारी करण्यात आलेल्या मसुद्याने भारतभर चर्चेचा गदारोळ उडाला. देशभरातील तमाम "नेटिझन्स’चा यामुळे संताप झाला. सरकारच्या कोणत्याही निर्णयाचे जोरदार समर्थन होत असलेल्या सोशल मीडियावर "एन्क्रिप्शन पॉलिसी’ जाहीर होताच सरकारचे अक्षरशः धिंडवडे काढणाऱ्या प्रतिक्रियांचा पाऊसच पडला.
चिवचिवाटाविषयी अधिकच संवेदनशील असलेल्या राज्यकर्त्यांनी धोरणच मागे घेतले. भारत हा लोकशाहीवादी देश असून येथे प्रत्येकाला स्वतःच्या मर्जीने आयुष्य जगण्याचे स्वातंत्र्य आहे. "नॅशनल डाटा एन्क्रिप्शन पॉलिसी’मुळे ‘नेटकऱ्यांची’ मुस्कटदाबी करण्याचा डाव हाणून पडला असे म्हणायला काही हरकत नाही.