आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकरी वाचवा हो...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शेतकऱ्यांना संकटांना तोंड द्यावे लागते त्याची सरकारने दखल घ्यायला हवी. शेतीमालाला भाववाढ मिळत नाही. त्यांना काही वेतन आयोगही नाही.सरकारी नोकर संघटित आहेत, त्यांनी बरोबर सातवा वेतन आयोग पदरात पाडून घेतला. सरकारी कर्मचाऱ्यांची तिपटीने पगारवाढ झाली आहे. शिवाय दरवर्षी त्यांना महागाई भत्ता वाढवून मिळतो ते वेगळेच. इकडे मात्र शेतकऱ्यांच्या आत्महत्यांत वाढ झाली आहे. त्यामुळे स्वामिनाथन समितीच्या शिफारशी मंजूर व्हाव्यात, त्यानुसार शेतकऱ्यांच्या मालाचे भाव वाढवण्यात यावेत व ते मंजूर करण्यात यावेत. तसेच काँग्रेस सरकारने सीलिंग लावून शेतकऱ्यांच्या जमिनी हिसकावून फक्त ५५ एकरांवर ठेवल्या म्हणून शेतकऱ्यांना २ हेक्टरपर्यंत सवलतीचा लाभ देण्यात येतोच तसेच कोरडवाहू शेतकऱ्यांना १० हेक्टर, ओलीत शेतकऱ्यांना ५ हेक्टरपर्यंत समान लाभ द्यावा, तरच शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबतील. अत्यल्प व अल्प भूधारकांना अधिक सवलती द्याव्यात, जेणेकरून आत्महत्या थांबण्यास पुरेशी मदत होईल. तसेच सरकारी चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांना पगार असेल त्याप्रमाणात शेतकऱ्यांना जीवन मानधन द्या. शेतकऱ्यांना कोणी तरी -वाचवा हो...
भानुदास पुंडलिकराव वाकोडे, गोरेगाव खुर्द, ता. जि. अकोला
बातम्या आणखी आहेत...