आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घ्या रजा... करा मजा...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डिसेंबरात सरकारी खात्यातर्फे पुढील वर्षीच्या सुट्यांची यादी, संख्या प्रसिद्ध केली जाते. ती पाहता आपला देश काम करण्यात धन्यता मानणाऱ्या कर्मचाऱ्यांचा देश आहे की सुटीची मजा लुटणाऱ्या आळशी नागरिकांना देश आहे, अशी शंका निर्माण होते. उत्तर प्रदेश सरकारने जाहीर केलेल्या सुट्यांची संख्या बघता तेथील सरकारी कर्मचारी वर्षाच्या ३६५ दिवसांपैकी २०१ दिवस हक्काने आरामात घरी बसू शकतो. वरवर पाहता हे आश्चर्यकारक वाटेल, पण हिशेब केला की त्यामागचे रहस्य सहज उलगडेल. ५२ शनिवार, ५२ रविवार ह्या व्यतिरिक्त प्रत्येक कर्मचारी ३० दिवसांची अर्नड लिव्ह, १४ दिवसांची कॅज्युअल लिव्ह घेऊ शकतो. शिवाय मेडिकल लिव्ह वेगळी. ह्या व्यतिरिक्त सणावारांच्या, जयंतीच्या सार्वजनिक सुट्या वेगळ्याच. त्यानंतर नेत्यांच्या जयंत्या तसेच राज्यातील केंद्रातील नेते, राष्ट्रपुरुषांच्या जयंत्या आदी वेगळ्याच. शिवाय लोकल हॉलीडे वेगळेच. यामुळे काम कमी, सुट्या जास्त, असे चित्र असल्यामुळे कामे होत नाहीत. पगारवाढीची आंदोलने आदी काम पाहता म्हणावे वाटते, घ्या रजा आणि करा मजा.

डॉ. विजय पांढरीपांडे, माजी कुलगुरू, बामु, हैदराबाद