आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिजाऊंचे संघर्षमय जीवन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
माँसाहेब जिजाऊ...एक प्रेरणास्थान, एक कुशल नेतृत्व, मातृत्व. अशा अनेक भूमिकांतून जाणाऱ्या राजमाता राष्ट्राच्या आदर्श माता आहेत. जिजाऊंना युद्धनीती, राजनीती, विविध भाषा लहानपणीच शिकवण्यात आल्या. त्यांना मराठी, संस्कृत, कन्नड, फार्सी, तेलगु, उर्दू, हिंदी आदी भाषा अवगत होत्या. त्यांना बलाढ्य व लढवय्ये माहेर व सासरची पार्श्वभूमी होती. शहाजीराजे व माँसाहेब जिजाऊ यांच्या प्रेरणेने शिवरायांनी स्वराज्य निर्माण केले. स्वराज्य सुराज्यात रूपांतरित करण्यासाठी जिजाऊंचे विचार व उपदेश, आचरण प्रेरणादायी ठरले. जिजाऊ माँसाहेबांनी अनेक सामाजिक रूढी व कटू प्रथा बंद केल्या. शेतकऱ्यांना बी-बियाणे, कर्जे देण्याची व्यवस्था केली. दुष्काळात शेतकऱ्यांची कर्जेही माफ केली. शिवरायांना अनेक क्रांतिकारी निर्णय घेण्यासाठी प्रोत्साहन दिले. जिजाऊंचे जीवन संघर्षमय होते. शिवरायांचे थोरले पुत्र संभाजीराजे यांचाही सांभाळ केला. त्यांची जडणघडण केली. स्वराज्याला दुसरा छत्रपती मिळवून दिला. माँसाहेब जिजाऊंच्या चरित्रातून आजच्या महिलांनी स्त्री भ्रूणहत्या, महिलांवरील अत्याचाराविरुद्ध लढण्याची प्रेरणा घेणे गरजेचे आहे.
डॉ. कपिल काकासाहेब झोटिंग, जालना
बातम्या आणखी आहेत...