आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुढीपाडव्याला साजरे करू अापण नववर्ष !

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आपल्या भारतीयांनी ३१ डिसेंबर साजरा करायलाच नको, भारतीयांनी जानेवारीपासून सुरू होणारे नववर्ष मानायलाच नको. कारण आपण भारतीय आहोत. आपणास चांगली सुशील, शीलवान संस्कृती आहे. आपले खरे नववर्ष चैत्र प्रतिपदेलाच सुरू होते. त्यास आपण गुढीपाडवा म्हणतो. आपल्या भारतीय संस्कृतीचे नववर्ष पाहा कशा सुंदर पद्धतीने साजरे करावे, अशी आपली सुशील, सुविचारी, उच्च संस्कृती सांगते. गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी अभ्यंगस्नान करून वस्त्रालंकारांनी सजावे. ध्वज उभारून तोरणे लावावी, गुढी उभारावी, तिची पूजा करावी. गणरायाचे, गुरूचे पूजन करावे.अमृतापासून उत्पन्न झालेल्या कडुलिंबाच्या कोवळ्या पानाचे चूर्ण करून ते खावे म्हणजे अनेक व्याधींचा नाश होऊन सुख, विद्या, लक्ष्मी, संपत्ती प्राप्त होईल. खरे तर ही आपली संस्कृती. पाश्चात्त्य आणि आपल्या संस्कृतीतील फरक पाहा. ३१ डिसेंबरला एकदा का दारू ढोसली की तो किंवा ती कुणाला काही समजत नाही. उलट या दारूमुळे व इतर व्यसनांमुळे त्यास अनेक व्याधी होतात. लक्ष्मी जाते, आयुष्य कमी होते, दारूमुळे व इतर व्यसनांमुळे धांगडधिंगा करून अनेक जखमा होतात.
श्रीकांत महाजन, बनशेंद्रा, ता. कन्नड