आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पेट्रोल, डिझेलचे गणित असे कसे?

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आपल्या देशात पाण्याचा अन् धान्याचा दुष्काळ कित्येक वेळा सर्वसामान्यांना भोगायला मिळाला आहे, परंतु मागच्या वर्षात कच्च्या तेलाचे भाव जागतिक स्तरावर भलतेच गडगडले आहेत. सध्याच्या कच्च्या तेलाची किंमत 12 वर्षांच्या नीचांकावर आली आहे. ती मागच्या दीड वर्षाच्या मानाने 75% ने कमी झाली आहे अन् त्या वेळी पेट्रोलचा दर 30 रु. होता. मग पेट्रोलचे दर दीड वर्षापूर्वीच्या 83 रु.च्या 75 % ने कमी म्हणजे 30 रु. व्हायला पाहिजेत. ज्याप्रमाणे खाद्यपदार्थांचे भाव वाढले की दुसऱ्या सेकंदालाच वाढतात, मात्र कमी झाले तर महिना महिना कमी करण्याचा विचार नसतो, त्याचप्रमाणे पेट्रोलच्या बाबतीतही तसेच घडत आहे. त्याचप्रमाणे पेट्रोलचे दर मागच्या वर्षी वाढल्यामुळे सर्वच वस्तूंच्या भावात भरमसाट वाढ झाली आहे, पण आता पेट्रोलचे भाव कमी झाले तरी कुठल्याही वस्तूचे अन् वाहतुकीचे दर कमी करायला कुणीही तयार नाही. निदान आपल्या देशात भरमसाट वाढलेल्या खासगी गाड्या वापरणाऱ्यांना तरी जागतिक मंदीमुळे होणाऱ्या स्वस्त पेट्रोलचा फायदा मिळू द्या..
ज्ञानेश्वर गायकवाड, औरंगाबाद