आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुरेश प्रभू यांची रेल्वे प्रवासी सेवा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सुरेश प्रभू हे रेल्वेमंत्री आहेत. ते काही दिवसांपासून ट्विटरवर आहेत. स्वत:साठी नव्हे, तर रेल्वे प्रवाशांसाठी. केंद्रातील असा मंत्री की जो रेल्वेमंत्री ही जबाबदारी सांभाळून प्रवाशांना ट्विटरच्या माध्यमातून झटपट सेवा देण्याचा प्रयत्न करत आहे. काही दिवसांपूर्वी एक तरुणी रेल्वेमधून प्रवास करत असता एक व्यक्ती रेल्वेमध्ये तिला त्रास देत होता. त्या तरुणीने प्रसंगावधान दाखवून ट्विटरवरून थेट रेल्वेमंत्र्यांना संपर्क साधला. प्रभू यांनी झटपट त्या तरुणीला परत संदेश करत ती प्रवास करत असलेल्या रेल्वेचा पीएनआर नंबर विचारला व तातडीने काही अधिकाऱ्यांशी संपर्क करून त्या तरुणीला त्या व्यक्तीच्या तावडीतून सोडवले. तसेच अन्य प्रवाशांसाठी जेवणाची व पाण्याची व्यवस्था झटपट करून तत्पर सेवा दिली. अशा काही घडामोडी ट्विटरच्या माध्यमातून घडत आहेत. खरेच हा खूप मोठा क्रांतिकारी निर्णय आहे. भारतात रेल्वेचे नेटवर्क खूप मोठे आहे, रेल्वे प्रशासनाला प्रत्येक प्रवाशाकडे ध्यान देणे शक्य नाही; पण सोशल मीडियाच्या माध्यमातून रेल्वे मंत्रालयाला थेट प्रवाशांपर्यंत पोहोचता आले हे विशेष. अशाच उपाययोजना बाकीच्या खात्यांनी केल्या तर ट्विटर, फेसबुकच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचता येईल वा त्वरित संपर्क साधता येईल. यामुळे जनता व रेल्वे यांच्यातील फार मोठी दरी कमी होईल.
संदीप कानडे, औरंगाबाद.
बातम्या आणखी आहेत...