आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाहनांचा पूर, प्रदूषणाचा भस्मासुर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दिल्लीत सम व विषम क्रमांकांनुसार वाहतुकीचा प्रयोग सुरू करण्यात आला आहे. हे पर्यावरण संरक्षण व नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने चांगले पाऊल आहे. देशातील ५० टक्के लोक नागरी क्षेत्रात राहतात. सर्व सोयी शहरात एकत्रित झाल्याने शहरीकरण वाढले आहे. त्यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. जागेच्या किमती वाढल्या. त्यामुळे सामान्य ते अतिसामान्य झोपड्यात राहू लागली. घरे घेणे स्वप्नच राहिले आहे. भूमाफिया, झोपडपट्टी माफिया, वाळू माफिया वाढले. शहरी वातावरण गुन्हेगारी पोषक ठरले. विस्तार वाढल्याने व्यक्तिगत वाहन गरजेचे झाले आहे. कार्यालये शहरात झाली. शिक्षण शहरात झाले. प्रदूषणाचा भस्मासुर आपणच निर्माण केला आहे. आता त्याला आवरावेच लागणार आहे. स्वयंशिक्षण काळाची गरज आहे. स्वैर व्यवस्था कुठेही सुखी व शांत राहू शकत नाही. त्यामुळे प्रदूषणावर उपाययोजना करण्याची गरज आहे. नागरिकांनीही त्यासाठी पुढाकार घेणे काळाची गरज बनली आहे.
श्रीकृष्ण लांडे, खामगाव