आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवीन वर्षात कृतिशील होण्याची गरज

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
२०१५ परिवर्तनात गेले. अनेक बरे-वाईट निर्णय झाले. अच्छे दिन यावेत, ही सर्वांचीच सकारात्मक बाजू आहे. बुरे दिन आणणाऱ्यांना धारेवर धरले जावे. लोकांनी लोकशाहीत सतर्क, कृतिशील राहावे, तरच आपापली कर्तव्ये आणि हक्क जपले जातील. न्यायालयीन सक्ती असल्याचे अनेक प्रकरणांत नेहमीच अनुभवाला येते. सेवा हक्क कायदा, माहितीच्या अधिकाराचा प्रभावी वापर करण्यासाठी नागरिकांना साक्षर करावे लागणार आहे. अनेक घोटाळ्यांनी देश नागवला गेला आहे. सामान्य सुखी नाहीत. आंतरराष्ट्रीय दहशतवाद फोफावत आहे. सर्वांनी सतर्क राहावे, असे चित्र आहे. शेतकऱ्यांची अवस्था प्रत्येक वर्षी आणखी बिकट होत आहे. ग्लाेबल वाॅर्मिंगची मोठी समस्या उभी असून त्याचे परिणाम मानवाला आताच भोगावे लागत आहेत.
श्रीकृष्ण लांडे, खामगाव.
बातम्या आणखी आहेत...