आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गणेशोत्सवातून दुष्काळासाठी ३० टक्के निधी वाचवा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

टिळकांनी गणेशोत्सवाबाबत मांडलेली संकल्पना आपण विसरत चाललो आहोत. आज महाराष्ट्रावर दुष्काळाची छाया असून शेतकरी त्रस्त आहेत.

राज्यातील सर्व गणेश मंडळांनी खर्चात ३० टक्के कपात करून शिल्लक पडलेली रक्कम शेतकऱ्यांना मदत म्हणून वापरावी. जेणेकरून बळीराजाला बळ मिळून तो आत्महत्येकडे वळणार नाही. तरुणांनी संकल्प केला तर राज्यातून कोट्यवधींचा निधी दुष्काळासाठी जमा होऊ शकतो. यातून सहजपणे दुष्काळावर मात केली जाऊ शकते. सध्या शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्याची खूप आवश्यकता आहे. याच पद्धतीने मंडळांनी समाजाेपयोगी उपक्रम हाती घेतले पाहिजेत. यात रक्तदान शिबिरे, समाजाचे एकत्रीकरण, गरिबांसाठी अन्नदान असे उपक्रम राबवता येऊ शकतात. जळगावसारख्या छोट्या शहरात प्रत्येक मंडळाने ३० झाडांचे रोपण व संगोपन केल्यास लवकरच जळगाव हरित शहर म्हणून ओळखले जाईल. आजच्या तरुणांनी या गोष्टींचा विचार करावा, एवढेच. गणपती बाप्पा मोरया...