आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेडिमेड सुटे भाग जोडून बनवले जात आहेत बंगले; 36 तासांत घर तयार, ट्रकमध्ये भरून कुठेही घेऊन जा...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन - ब्रिटनमध्ये रेडिमेड घरांच्या विक्रीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. अशा घरांची निर्मिती वेगवेगळे तयार आणि सुटे पार्ट जोडून केली जात आहे. म्हणजेच, बेडरुम, किचन, बाथरूम हे सगळेच वेगवेगळे डिझाईनमध्ये तयार करून येत आहेत. या घरांना ग्राहकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. कारण, ही घरे आणि घरातील प्रत्येक रुम ग्राहकांच्या आवडीनुसार तयार करून पाठवले जातात. त्यातच सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे, शिफ्टिंग करताना घरातील केवळ साहित्यच नव्हे, तर अख्खे घर डिसेंबल करून ट्रकमध्ये कुठेही घेऊन जाता येईल. 

 
यॉर्कशायर शहरातील इल्क फॅक्ट्रीने अशा प्रकारच्या प्री-फॅब घरांची निर्मिती आणि विक्री सुरू केली आहे. यात 3BHK घर 65 हजार पाउंड अर्थात जवळपास 59 लाख रुपये आहे. यात जमीनीची किंमत वेगळी राहील. ठरवलेल्या जागेवर कुठेही आपल्याला हे घर अॅसेंबल करता येणार आहे. लोक जसे हे घर ट्रकमध्ये भरून आपल्या जमीनीवर घेऊन येत आहेत. तसेच शिफ्टिंगच्या वेळी सहज उचलूनही घेऊन जात आहेत.


नोकरीपेशा लोकांसाठी सर्वात उपयोगी...
एक्सपर्ट्सच्या मते, ब्रिटनमध्ये बांधकाम क्षेत्रात ही एक क्रांतीच आहे. पारंपारिक पद्धतीने यापूर्वी केल्या जाणाऱ्या घरांच्या बांधकामाला आता प्रतिसाद मंदावला आहे. त्यापेक्षा लोक या रेडिमेड घरांना अधिक पसंती देत आहेत. यापूर्वी घरांचे बांधकाम करण्यासाठी 40 आठवड्यांपर्यंतची वेळ लागायची. परंतु, आता अशा प्रकारची प्रीफॅब घरे 10 दिवसांत ऑर्डर देऊन तयार केले जाऊ शकतात. याचा सर्वात जास्त फायदा युवक आणि नोकरीपेशा असलेल्या लोकांना होत आहे. सतत नोकरी बदलत असताना नवीन घर घेण्याची गरज नाही. फक्त जागा घेऊन हे घर लॉरीत लादून तेथे लावता येईल.


दरवर्षी 2000 घरे बांधणार कंपनी
रीफॅब घर बनवणारी कंपनी इल्क होम्सच्या अधिकाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे, त्यांना मिळणाऱ्या ऑर्डर्सची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. इंग्लंड आणि वेल्ससह ब्रिटनच्या विविध भागात या घरांची मागणी होत आहे. त्यामुळे, रीफॅब कंपनी आता दरवर्षी सरासरी 2 हजार घरे बनवणार आहे. यानंतर काही दिवसांत त्यांची वार्षिक सरासरी 5 हजारपर्यंत करण्याचा प्रयत्न राहील. केवळ लीड्स शहरात अशा प्रकारची 3500 घरे बांधण्यात आली आहेत. ब्रिटनचे बांधकाम आणि गृहनिर्माण मंत्री जेम्स ब्रोकेनशायर यांनीही या घरांच्या नव्या शैलीचे कौतुक केले आहे. सरकार सुद्धा अशाच प्रकारची घरे घेऊन देशभरातील बेघरांना देण्याचा विचार करत आहे. काही ठिकाणी अशा प्रकारची कामे सुरू देखील करण्यात आली आहेत.

बातम्या आणखी आहेत...