आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंचवीस हजारांच्या गुंतवणुकीतून सुरू झाले रेडी-टू-कुक ब्रँड 'आयडी फ्रेश'

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बिझनेस- रेडी-टू-कुक ब्रँड "आयडी फ्रेश'ची सुरुवात २५ हजारांच्या गुंतवणुकीने झाली होती. आज त्याची उलथापालथ शेकडो कोटी रुपयांची आहे. हे स्टार्टअप २००५ च्या डिसेंबर महिन्यात पीसी मुस्तफा यांनी आपल्या काही भावांसमवेत सुरू केले होते. इडली आणि दोसा बनवण्याने हे काम सुरू झाले. स्वयंपाकघर होते केवळ ५० स्क्वेअर फूट जागेत. हेतू होता व्यग्र महिलांना चांगल्या गुणवत्तेचा इडली- तयार दोसा पीठ उपलब्ध करून देणे. मुस्तफा यांनी त्या काळी तयार पीठ पुरवठ्याचा निर्णय घेतला. तेव्हा लोक ते स्वीकारत नसत. आज ते ६०,००० किलो तयार पीठ रोज विकतात. 

 

या सुरुवातीनंतर ६ महिन्यांनी मुस्तफा यांच्या टीमवर काही संकटे आली. त्यांनी बंगळुरू येथे किराणा दुकानात काही पॉकेट््स पाठवले होते. तेथे फ्रिज नसल्यामुळे ते ओव्हर-फर्मेंट झाले आणि स्फोट झाला. या घटनेतून मुस्तफा यांनी धडा घेतला आणि पॅकेजिंग-मॅन्युफॅक्चरिंगवर पूर्ण लक्ष केंद्रित केले. प्रत्येक दुकानात माल ठेवता येणार नाही हेही त्यांच्या लक्षात आले. २००७ मध्ये बचतीतून ६ लाख रुपयांचे दोन मशीन्स खरेदी केले. मोठी जागा खरेदी केली. हळूहळू ब्रँडिंग सुरू केले. इडलीचे आय घेतले आणि दोस्याचे डी. केवळ २००० रुपये देऊन कपंनीने लोगो आणि पॅकेजचे डिझाइन करून घेतले. हळूहळू गुंतवणूकदार आकर्षित होऊ लागले. २०१७ पर्यंत हे सुरू होते. कंपनी रेडी टू कुक, फ्रेश इंडियन फूड्सचे नानाविध प्रकार ठेवते. कंपनीची उत्पादने १०० टक्के नैसर्गिक वातावरणात तयार होतात. आयडीचे पदार्थ त्यामुळेच जिभेवर रेंगाळतात. 

 

हेही जाणून घ्या... 
- केरळच्या वायनाड जिल्ह्यातील एका गावात राहणारे मुस्तफा यांचे पिता कॉफी कारखान्यात हमाली करायचे. 
- कंपनी आपल्या यशाचे श्रेय एका वडा-मेकर व्हिडिओला देते जो व्हायरल झाला होता.
- या वर्षी १०० कोटींची कमाई केवळ वड्यांच्या विक्रीतून होईल, अशी आशा आहे. 
 

बातम्या आणखी आहेत...