Home | Gossip | real cricketers will play roll in film ranveer singh's film '83'

'83' मध्ये क्रिकेटपटूच साकारणार दिग्गजांचे पात्र, क्रिकेटचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर कलाकारांनी असा जल्लोष केला

दिव्य मराठी वेब टीम  | Update - Apr 13, 2019, 05:26 PM IST

चित्रपटात ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंड अाणि वेस्ट इंडीजच्या संघासाठी फायनल झाली निवड...  

 • real cricketers will play roll in film ranveer singh's film '83'

  एंटरटेन्मेंट डेस्क : आपला क्रिकेटवर आधारित चित्रपट '83' पूर्णपणे वास्तविक बनवण्याची कबीर खान यांची इच्छा आहे. याच उद्देशाअंतर्गत भारतीय संघातील इतर विदेशी खेळाडूंची पात्रे साकारण्यासाठी दक्ष क्रिकेटपटूंची निवड करण्यात आली. या पात्रांसाठी इंग्लंडच्या काउंटी संघाकडून खेळणाऱ्या क्रिकेटपटूंची निवड केली आहे. हे खेळाडू इंग्लंडचे घरगुती संघ डर्बीशायर, डरहॅम, सॅमरसेट, सरे, याॅर्कशायर, हँपशायर, एसेक्स, केंट, मिडलसेक्स इत्यादींमध्ये खेळतात. तसेच त्यांना क्रिकेटचे नियम आणि या खेळातील बारकावे चांगल्या प्रकारे माहीत आहेत. त्यापैकीच असलेल्या क्लाइव्ह लॉइड, डंकन फ्लेचर, दुलीप मेंडिस, बॉब विलीस यासारख्या क्रिकेटपटूंचे पात्र साकारणाऱ्या खेळाडूंची निवड करण्यात आली. चित्रपटाशी संबंधित सूत्रांनी या वृत्तास दुजोरा दिला आहे. उल्लेखनीय म्हणजे यात भारतीय संघातील खेळाडूंचे पात्र साकारणारे अभिनेत्यांची निवड यापूर्वीच निश्चित करण्यात आली.

  शूटिंगचे दीर्घ वेळापत्रक...
  सर्व अभिनेते जूनपासून शूटिंग सुरू करतील. रणवीर सिंह, साकिब सलीम, जतीन सरना, साहिल खट्टरसह इतर कलावंतांसाठी या शूटिंगचे दीर्घ वेळापत्रक असेल. सर्व कलावंत आणि शूटिंग टीमचे सदस्य तीन महिने इंग्लंडमध्ये शूटिंग करत राहतील. 10 ऑक्टोबरपर्यंत शूटिंग पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले. सप्टेंबरमध्ये भारतात पॅचवर्क इत्यादीची शूटिंग होईल. त्यानंतर पाच महिने चित्रपटाचे पोस्ट प्रोडक्शन आणि स्पेशल इफेक्ट्सवर काम केले जाईल.
  रणवीर सिंह सोबत इतर चित्रपटाची टीम. क्रिकेटचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर कलाकारांनी असा जल्लोष केला.
  - 10 ऑक्क्टोबरपर्यंत शूट आणि प्री प्रॉडक्शन पूर्ण होईल.
  - 03 महिने इंग्लंडमध्ये चालेल शूटिंग
  - 10 एप्रिल 2020 ला रिलीज होईल चित्रपट
  - 05 महिने चालेल पोस्ट प्रॉडक्शन आणि विशेष प्रभावाचे काम
  - 125 कलाकारांची झाली निवड
  - 06 क्रिकेटची राष्ट्रीय दाखवली जाईल चित्रपटात

  वेस्ट इंडीज दिग्गजांची होणार भेट...
  या चित्रपटाशी संबंधित सूत्रांनी आणखी एक महत्त्वाची माहिती दिली आहे. इंग्लंडमध्ये शूटिंगदरम्यान चित्रपटाच्या टीमचे वेस्ट इंडीजच्या दिग्गज क्रिकेटपटूंसोबत गेट टुगेदर ठेवले जाईल. या खेळाडूंनी 1983 विश्वचषकाचा अंतिम सामना भारतासोबत खेळला होता. तथापि, भारतीय संघाच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे त्यांना हा सामना जिंकता आला नाही.

  कँपमध्ये सर्वांना झाल्या इजा
  नुकत्याच झालेल्या धर्मशाला बूट कँपमध्ये कलावंतांना अत्यंत कठीण सराव करावा लागला. गोलंदाजी, फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण करताना ते जखमी झाले. चिराग पाटील, ताहिर राज भसीन दोघेही फलंदाजी करताना बाउंसर चेंडूमुळे जखमी झाले. रणवीर सिंहच्या पाठीलाही इजा झाली. एकूणच या सर्व कलावंतांसाठी हा चित्रपट शारीरिकदृष्ट्या खूपच आव्हानात्मक ठरणार आहे.

Trending