आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभारताचा 72वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात सर्वत्र साजरा केला जात आहे. त्यानिमित्त divyamarathi.com एका अशा भारतीय गुप्तहेराबाबत माहिती देणार आहे, ज्याची कथा एखाद्या जेम्स बाँडच्या तुलनेत जराही वेगळी नाही. हा एक असा गुप्तहेर होता, जो भारतीय असूनही पाकिस्तानच्या लष्करात मेजर बनला होता. ते होते राजस्थानच्या श्रीगंगानगर येथील राहणारे रॉचे (रिसर्च अँड अॅनालिसिस विंग) माजी एजंट रवींद्र कौशिक. त्यांनी पाकिस्तानातील मिशन पूर्ण करण्यासाठी मुस्लीम धर्मदेखिल स्वीकारला होता. चला तर जाणून घेऊया, त्यांच्याविषयी...
थिएटरमधील काम पाहून रॉने दिली नोकरीची ऑफर
- 11 एप्रिल 1952 ला जन्मलेले रवींद्र कौशिक एक थिएटर आर्टिस्ट होते. लखनऊमध्ये एका कार्यक्रमादरम्यान त्यांची भेट भारतीय गुप्तचर संस्था रॉच्या अधिकाऱ्यांबरोबर झाली होती. काम पाहून त्यांनी रवींद्रसमोर नोकरीचा प्रस्ताव ठेवला होता. रॉच्या अधिकाऱ्यांना रवींद्र यांना पाकिस्तानात गुप्तहेर बनवून पाठवायचे होते. पाक मिशनवर गेले त्यावेळी रवींद्र अवघे 23 वर्षांचे होते.
- पाकिस्तानात जाण्यापूर्वी त्यांना दिल्लीत सुमारे दोन वर्ष ट्रेनिंग देण्यात आली. रिपोर्ट्सनुसार पाकिस्तानात त्यांना कोणताही त्रास होऊ नये म्हणून त्यांनी मुस्लीम धर्मही स्वीकारला होता. अधिकाऱ्यांनी त्यांनी उर्दू, मुस्लीम आणि पाकिस्तानबाबत पूर्ण माहिती दिली होती. पंजाबी बोलणाऱ्या या हेराला पाकिस्तानी बनण्यास फार परिश्रम करावे लागले नाही. कारण पाकिस्तानात बहुतांश भागात पंजाबीही बोलली जाते.
- त्यावेळी आधीच भारत चीन आणि पाकिस्तानच्या डोळ्यात खुपत होता. 1971 मध्ये बांगलादेश(त्यापूर्वी पाकिस्तान होता) बनल्यानंतर पाकिस्तानने नव्याने हल्ल्याची तयारी केली होती. 1975 मध्ये रवींद्रला पाकिस्तानात पाठवण्यात आले. तेथे त्याने कराची विद्यापीठात प्रवेश घेतला.
पाकिस्तानी तरूणीशी केला प्रेमविवाह
नबी अहमद शाकीर नावाने पाकिस्तानचे नागरिकत्व स्वीकारून लॉचे ग्रॅज्युएशन केल्यानंतर रवींद्र पाकिस्तानच्या सैन्यात भरती झाला. लष्करात त्यांना प्रमोशन देत मेजर रँक देण्यात आला होता.
स्थानिक तरुणी अमानतबरोबर प्रेमविवाह केला. त्यानंतर त्यांना एक मुलगी झाली. 1979 पासून 1983 पर्यंत त्यांनी लष्कर आणि सरकारशी संबंधित बरीच महत्त्वाची माहिती भारत सरकारपर्यंत पोहोचवली. त्यावेळी गृहमंत्री एसबी चव्हाण यांनी त्यांना 'ब्लॅक टाइगर'किताब दिला.
रविंद्र यांच्या माहितीमुळे अनेक हल्ले टळले
रविंद्रने त्याच्या जीवनातील सुमारे 30 वर्षे कुटुंबापासून दूर एका अशा देशात घालवली ज्याठिकाणची स्थिती अगदीच प्रतिकूल होती. अनेकदा पाकिस्तान राजस्थानच्या सीमेवरून हल्ला करण्याचा प्रयत्न करायचा. पण भारताला आधीच महत्त्वाची माहिती मिळाल्याने ते शक्य होत नव्हते.
शेवटी असे उघड झाले गुपित
- 1983 मध्ये रवींद्र कौशीला भेटायला रॉने एक आणखी एजंट पाकिस्तानात पाठवला. पण तो पाकिस्तानच्या गुप्तचर यंत्रणांच्या हाती लागला आणि अत्यंत कठोर चौकशीअंती त्याने रवींद्रबाबत सर्वकाही सांगितले.
- रवींद्रने पळून भारतात येण्याचा प्रयत्न केला पण भारत सरकारने त्याला परत आणण्यात रस घेतला नाही, असे सांगितले जाते. अखेर रवींद्रला अटक करून सियालकोटच्या तुरुंगात डांबण्यात आले. चौकशीदरम्यान मोठ्याप्रमाणावर त्रास देऊनही त्याने भारताबाबत काहीही माहिती देण्यास स्पष्ट नकार दिला होता. 1985 मध्ये रवींद्रला मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली. त्यानंतर तिचे रुपांतर जन्मठेपेत झाले. मियावाली जेलमध्ये 16 वर्षे तुरुंगात राहिल्यानंतर 2001 मध्ये त्याचा मृत्यू झाला.
रवींद्र यांच्याशी संबंधित सर्व रेकॉर्ड नष्ट
भारत सरकारने रवींद्रशी संबंधित सर्व रेकॉर्ड नष्ट केले. सोबतच रॉलादेखिल या प्रकरणी शांत राहण्याचे आदेश दिले. रवींद्रचे वडील इंडियन एयरफोर्समध्ये अधिकारी होते. निवृत्तीनंतर ते टेक्सटाइल मिलमध्ये काम करू लागले. रवींद्रने तुरुंगातून त्याच्या कुटुंबीयांना अनेक पत्रे लिहिली होती. त्यात तो त्याच्यावर होणाऱ्या अत्याचारांबाबत सांगायचा. एका पत्रात त्याने वडिलांना असे विचारले होते की, भारतासारख्या मोठ्या देशात त्याग करणाऱ्याला हेच फळ मिळते का?
पुढील स्लाइडवर पाहा, रवींद्र कौशिक यांचे फोटोज...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.