आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

1967 मध्ये समुद्र किनारी दिसली होती जलपरी, एका अटीवर फोटोग्राफरने वृत्तपत्राला छापायला दिला होता Rare Photo

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कॅनडा - जगभरात अशा अनेक घटना घडत असतात ज्याची उत्तरे कुणाकडेही नसतात. कॅनडाला लागून असलेल्या मुख्य बेटावर अशीच एक घटना समोर आली होती. 1967 मध्ये येथे एक सुंदर जलपरी आढळल्याचा दावा करण्यात आला होता. येथे एका जहाजावरून जाणाऱ्या काही लोकांनी या जलपरीचे फोटो काढले होते. त्याकाळातील एका वृत्तपत्राने ते प्रकाशित केले होते. या फोटोतील जलपरीबाबत आपण आज माहिती घेणार आहोत.


जहाजातून दिसली होती जलपरी 
14 जून 1967 ला कॅनडाच्या द डेली कॉलोनिस्ट या वृत्तपत्राने मेन आयलंडजवळ जलपरी दिसल्याचे छापले होते. वृत्तपत्राने जलपरीचा फोटोही छापला होता. फोटोमध्ये जलपरीसारखी महिला समुद्रकिनारी बसलेली आढळली होती. क्वीन ऑफ सॅनिच Queen of sanich नावाच्या जहाजावरील लोकांनी एक महिला समुद्र किनारी पाहिली, लांब केस असलेल्या या महिलेचे पाय नव्हते, तर तिचा शरिराचा खालचा भाग माशासारखा होता, असे त्याखाली लिहिले होते.


वृत्तपत्रात असे लिहिलण्यात आले होते की, फोटो देणाऱ्याने नाव न देण्याच्या अटीवर फोटो प्रकाशित करण्यासाठी दिली होती. तसेच ही जलपरी अत्यंत सुंदर होती असेही त्या व्यक्तीने सांगितले होते. जेव्हा त्या व्यक्तीला नाव न छापण्याचे कारण विचारण्यात आले तेव्हा तो म्हणाला, लोक माझ्या म्हणण्यावर विश्वास ठेवणार नाहीत आणि माझी खिल्ली उडवतील.


नंतर जाहीर केले बक्षीस 
बातमी छापल्याच्या दुसऱ्याच दिवशी वृत्तपत्राने जलपरीशी बोलणाऱ्या किंवा तिच्याबाबत माहिती आणणाऱ्याला 25 हजार डॉलर (आजचे सुमारे 17 लाख) बक्षीस जाहीर केले. या सागरी मार्गाने जाणारा व्यक्ती या जलपरीशी बोलू शकला किंवा तिला याठिकाणी आणू शकला तर त्याला बक्षीस दिले जाईल असे वृत्तपत्राने प्रकाशित केले होते.


जलपरी दिसली नाही, लोक आजही शोधतात 
बातम्या छापल्यानंतर आणि बक्षीस जाहीर केल्यानंतर कथित जलपरी कधीही दिसली नाही. त्या व्यक्तीच्या दाव्याचे काय झाले हेही कोणाला माहिती नाही. पण आजही या मार्गावरून जाणाऱ्यांची नजर जलपरीला शोधत असते.

बातम्या आणखी आहेत...