आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रणवीरपुर्वी रणबीर कपूरसोबत सीरिअस रिलेशनशिपमध्ये होती दीपिका, रंगेहात पकडल्यानंतर केले होते ब्रेकअप, विभक्त झाल्यानंतर कोलमडली होती

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंह आता पती-पत्नी झाले आहेत.  14 नोव्हेंबर रोजी कोकणी पद्धतीने दोघांचे लग्न झाले. रणवीर सिंहपूर्वी दीपिका अभिनेता रणबीर कपूरसोबत सीरिअस रिलेशनशिपमध्ये होती. दोघे 'बचना ए हसीनों' या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या काळात जवळ आले होते. पण काही दिवसांतच दोघांचे ब्रेकअप झाले होते. असे म्हटले जाते की, कतरिना कैफसाठी रणबीरने दीपिकाला दगा दिला होता. स्वतः दीपिकाने एका मुलाखतीत रणबीरसोबतच्या ब्रेकअपचे कारण स्पष्ट केले होते. 


जेव्हा दीपिकाने पकडले होते रणबीरला रंगेहात...
- दीपिकाने ब्रेकअपचे कारण सांगताना म्हटले होते, "तो मला मुर्ख बनवत होता. मी अशा रिलेशनशिपमध्ये का होते? यापेक्षा तर सिंगल राहिलेले बरे, असे मला वाटले होते. पण सगळ्यांनाच सगळ्या गोष्टी ठाऊक नसतात. मला अनेकांनी सांगितले होते की, तो मला दगा देतोय. मी कुणाच्याही बोलण्याकडे लक्ष दिले नाही. एकेदिवशी मी त्याला रंगेहात पकडले. या ब्रेकअपमधून बाहेर पडण्यासाठी मला काही काळ नक्कीच लागला. पण मी स्वतःच्या डोळ्यांनी जे पाहिले, त्यानंतर त्याच्याकडे पुन्हा परतण्याचा प्रश्नच नव्हता."


- दीपिका पुढे म्हणाली होती, "जेव्हा त्याने (रणबीरने) पहिल्यांदा मला दगा दिला तेव्हा आमच्या रिलेशनशिपमध्ये काहीतरी चुकीचे घडत असल्याचे मला वाटले. पण जेव्हा हा एखाद्याच्या स्वभाव बनतो, तेव्हा नात्यात अडचणी येतात. मी या रिलेशनशिपसाठी बरेच काही दिले, पण त्याच्या मोबदल्यात कसलीच आशा ठेवली नाही. पण जेव्हा सन्मान, विश्वासला तडा जातो, तेव्हा अशा नात्यात नसलेलेच बरे असते."

 

रणबीरसोबत ब्रेकअपनंतर कोलमडली होती दीपिका... 
- दीपिकाने मुलाखतीत सांगितले होते, की रणबीरपासून विभक्त झाल्यानंतर ती पुर्णपणे कोलमडून गेली होती. रडूनरडून ती बेहाल झाली होती. इतकेच नाही तर ती डिप्रेशनमध्ये गेली होती. एकटेपणापासून वाट काढण्यासाठी तिने स्वतःला कामात गुंतवणून घेतले होते. दीपिकाने पुढे सांगितले होते, "हे नाते तुटल्यानंतर माझ्या लक्षात आले की, एखाद्या व्यक्तीसोबत एवढे अटॅच्ड व्हायला नको होते. ब्रेकअपनंतर मी खूप रडले होते. पण मी एक चांगली व्यक्ती बनली, यासाठी त्याला धन्यवाद."


मुलाखतीत दीपिकाने सेक्सविषयी केले होते वक्तव्य... 
- या मुलाखतीत दीपिकाने सेक्सविषयी वक्तव्य केले होते. ती म्हणाली होती, "माझ्यासाठी शारीरिक संबंध म्हणजे फक्त फिजिकल होणे नव्हे. यामध्ये दोघांचेही इमोशन्स इन्वॉल्व्ह असतात. मी रिलेशनशिपमध्ये असताना कुणालाही दगा दिला नाही, किंवा माझा स्वतःवरचा ताबाही सुटला नाही."

 

बातम्या आणखी आहेत...