आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आईच्या मृतदेहा सोबत घरात एकटी 2 वर्षाची चिमुकली, \'पीहू\' चित्रपटाच्या मागे आहेत दोन सत्य घटना...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- डायरेक्टर विनोद कापड़ीचा 'पीहू' चित्रपट शुक्रवारी रिलीज होत आहे. चित्रपटाची गोष्ट 2 वर्षाच्या मुलीची आहे, जिच्या आईचा मृतदेह घरात पडलेला असतो. चिमुकली घरात एकटी आहे, आणि तिला माहीत नाही की, तिच्या आईचा मृत्यु झाला आहे, अशातच ती चिमुकली तिच्या आईला बोलत आहे. फ्रिझ मधून जेवण बाहेर काढत आहे. पोळ्या भाजण्याचा प्रयत्न करताना चुकीने गॅस चालुच ठेवते. गोष्टीत अनेक दुख आहेत तर भिती पण आहे. पण तुम्हाला एैकुण धक्का बसेल की, ही गोष्ट खरी आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक कापडी यांनी एका इंटरव्ह्यूमध्ये सांगितले की, त्यांना या चित्रपटाची कल्पना कुठून आली. पार्टी कॅन्सल झाली तेव्हा आली कल्पना.

 

- कापडी इंटरव्ह्यूमध्ये म्हणाले, काही वर्षापुर्वी मला मला आणि माझ्या मित्रांना एका पार्टीचे आमंत्रण मिळाले होते. पण काही दिवसानंतर फोन आला की, त्यांनी त्यांच्या घरातील काम करणाऱ्या बाईला कामावरून काढुन टाकले होते म्हणुन पार्टी कॅन्सल केली आहे. कारण त्या बाईने त्यांच्या मुलाला 2-3 तास घरात कोंडून शॅापिंगला गेली होती. इथूनच मला माझ्या गोष्टीची कल्पना सुचली की, घरात मुले एकटी असताना ते काय करतात, त्यांचे काय होते.

 

नंतर एका घटनेमुळे मिळाली पुर्ण गोष्ट

- त्यांनी पुढे सांगितले की, "हि फक्त एक कल्पना होती. पण आम्हाला एका प्रॉपर गोष्टीची गरज होती. ऑगस्ट 2014 मध्ये मी दिल्ली-एनसीआरची एक बातमी वाचली, ज्यात लिहिले होते की एक साडेचार वर्षाचा मुलगा घरात एकटा बंद झाला आहे. तेव्हा मला वाटले की, या घटनेवर एक चित्रपट बनू शकतो."

 

अनेक स्टुडिओमध्ये चकरा मारल्या, नंतर 45 लाखांत  बनला चित्रपट

- विनोद कापड़ी यांनी सांगितले की, चित्रपटाची गोष्ट घेउन अनेक स्टुडिओमध्ये गेलो. अनेक प्रोड्यूसर्सची भेट घेतली. पण सगळे हेच म्हणायचे की, चित्रपट बनने अवघड आहे. सगळे म्हणायचे की, कसे एका छोट्या मुली सोबत चित्रपट बनवणार आणि हा कसा इंट्रेस्टिंग होईल. कापडींसाठी हे मोठे चॅलेंज होते. नंतर ते त्यांच्या एका मित्राला भेटले, त्याने काही फंड दिला. त्यानंतर 45-46 लाखांत आम्ही चित्रपटाची शुटींग पुर्ण केली. मी माझ्या क्रु मेंबरला माझ्या आर्थिक परिस्थिती बद्दल सांगितले, तेव्हा त्यांनी त्यांची फिस अर्धी केली. शुटिंग पुर्ण झाल्यावर आमच्या प्रोडुसरचा मृत्यु झाला. त्यामुळे फेस्टिवलमध्ये चित्रपट दाखवण्याशिवाय आमच्याकडे दुसरा पर्याय नव्हता. त्यानंतर रोनी स्क्रूवाला आणि सिद्धार्थ रॉय कपूर यांना चित्रपट आवडला आणि ते आमच्या सोबत आले. 

 

कशी केली 2 वर्षाच्या मुलीसोबत शुटींग

- त्यांनी सांगितले की, हे सगळ्यात अवघड काम होते. कारण ती आम्ही जे सांगत होतो ते न करता तिला जे करायचय तेच करत होती. त्यामुळे आम्हाला तिच्या मुडनुसार सगळी शुटिंग करावी लागली. 30-32 दिवसांमध्ये आम्ही शुटिंग पुर्ण केली.

 

बातम्या आणखी आहेत...