Home | International | Other Country | Real Story of a Adult Star Who Turned To a Church Nun, The Dark Secret of Adult Industry

पॉर्न शूट केल्‍यानंतर डोके सुन्‍न व्‍हायचे, स्‍वत:ची घृणा यायची; मात्र पैशांची भूक संपत नव्‍हती

दिव्‍य मराठी वेब टीम | Update - Sep 05, 2018, 12:00 AM IST

न्‍यूयॉर्कची प्रसिद्ध पॉर्न स्‍टार राहिलेली नादिया हिल्‍टनने आपले जीवन आणि पॉन इंडस्‍ट्रीतील काळी बाजू जगासमोर मांडली

 • न्‍यूयॉर्क- न्‍यूयॉर्कची प्रसिद्ध पॉर्न स्‍टार राहिलेली नादिया हिल्‍टनने (खरे नाव क्रिस्‍टन) आपले जीवन आणि पॉन इंडस्‍ट्रीतील काळी बाजू जगासमोर मांडली आहे. या इंडस्‍ट्रीमध्‍ये शिरल्‍यावर फार कमी जण त्‍यातून बाहेर पडण्‍यात यशस्‍वी होतात. यापैकीच एक म्‍हणजे नादिया. ती आज एका चर्चमध्‍ये नन म्‍हणून काम करते. पैशांच्‍या लोभापायी आपण एक किळसवाणे काम करत होतो, असे ती आता सांगते.


  गरीबीमुळे शिरले पॉर्नच्‍या जगात
  पॉर्नस्‍टार बनण्‍यापूर्वी नादियाचे आयुष्‍य हे संकटांनी भरलेले होते. वयाच्‍या केवळ 16व्‍या वर्षी ती गर्भवती होती. त्‍यानंतर कोणाच्‍याही आधाराविना आपल्‍या या मुलाला सांभाळण्‍यासाठी नादियाला फार कष्‍ट घ्‍यावे लागले. यासाठी नादियाने वेट्रेसपासून डान्‍सर नंतर क्‍लब्‍समध्‍ये स्ट्रिपर म्‍हणूनही काम केले. याचदरम्‍यान एका व्‍यक्‍तीने पैशांचे आमिष दाखवून तिला पॉर्न इंडस्‍ट्रीमध्‍ये आणले.


  जेव्‍हा पहिल्‍यांदा शूट केला मुव्‍ही
  - नादियाने सांगितले की, ती जेव्‍हा पहिल्‍यांदा पॉर्न सिनेमाच्‍या शुटिंगसाठी गेली होती, तेव्‍हा तिचे डोके सुन्‍न झाले होते. नादिया सांगते, 'पहिल्‍यांदा सीन पुर्ण शुट केल्‍यानंतर मला स्‍वत:चीच घृणा वाटू लागली होती. घरी गेल्‍यावर बाथरूमध्‍ये मी रात्रभर रडले. एक महिना मी घरातून बाहेर पडले नव्‍हते. मी हे कोणत्‍या व्‍यवसायात आले, असेच विचार मनात यायचे. मात्र पैशांच्‍या कमतरतेमुळे मला पुन्‍हा या कामात स्‍वत:ला ढकलावे लागले.'


  श्रीमंती वाढत गेली, मात्र आयुष्‍य नर्क झाले होते
  क्रिस्‍टलला एका पॉर्न सिनेमासाठी 21 लाख रूपयांहून अधिक पैसे मिळायचे. याद्वारे दरवर्षी ती 2 कोटी रूपये कमवायची. तिची श्रीमंती वाढत चालली होती. स्‍वत:साठी फेरारी, अलिशान परिसरात कार, स्‍वत:चे स्‍ट्रीप क्‍लब अशा सर्व सुखसोयी तिच्‍या पायाशी लोळत होत्‍या. मात्र मनातल्‍या मनात यासाठी कराव्‍या लागणा-या कामाची तिला खंत होती. क्रिस्‍टलने सांगितले की, 'पॉर्न सिनेमा शुट करण्‍यापूर्वी मी स्‍वत:ला पुर्णपणे नशेत डुबवून घ्‍यायचे.' यादरम्‍यान ती अनेक औषधी आणि ड्रग्‍सचेही सेवन करायची. ही ड्रग्‍स आणि औषधांशिवाय आपण पॉर्न सिनेमात कामच करू शकत नव्‍हतो, असे क्रिस्‍टलने सांगितले आहे.


  एका घटनेमुळे बदलले आयुष्‍य
  2014मध्‍ये क्रिस्‍टलचा एक भयंकर अपघात झाला. ज्‍यामुळे तिच्‍या जीवनाला कलाटणी मिळाली. कारण यानंतर तिच्‍या जिवनात डेव्हिड बॉसेट आले. ते पादरी होते. त्‍यांनी क्रिस्‍टला बायबलमधील गोष्‍टी सांगण्‍यास सुरूवात केली. याचा क्रिस्‍टलवर असा परिणाम झाला की तिने पॉर्न इंडस्‍ट्री सोडण्‍याचा निर्णय घेतला. तिने आपल्‍या कुटुंबाला वेळ देण्‍यास सुरूवात केली. तिला एक 16 आणि दुसरा 7 वर्षांचा मुलगा होता. नंतर तिने डेव्हिडशी विवाह केला. त्‍यांनाही एक मुलगा आहे.


  आता चर्चमध्‍ये लोकांना दाखवते दिशा
  क्रिस्‍टलने आपला भूतकाळ आता पुर्णपणे मागे टाकला आहे. ती आता चर्चमध्‍ये केवळ ईश्‍वराच्‍या भक्‍तीत लीन असते. आपल्‍या पतीसोबत मिळून तिने एक चर्चही सूरू केले आहे. यामध्‍ये ती अडचणीत असलेल्‍या लोकांना मार्गदर्शन करते. • Real Story of a Adult Star Who Turned To a Church Nun, The Dark Secret of Adult Industry
 • Real Story of a Adult Star Who Turned To a Church Nun, The Dark Secret of Adult Industry

Trending