आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PM मोदींनी 15 लाख सॅलरीवर नेमली मेकअप आर्टिस्ट, जाणून घ्या व्हायरल होणाऱ्या या फोटोमागचे सत्य

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदींचे राहणीमान आणि कपड्यांबाबत नेहमी नवनवीन दावे केले जात असतात. विरोधी पक्ष तर मोदी सरकारला सूट बुटाचे सरकारही म्हणते. आता पंतप्रधान मोदींचा एक असा फोटो व्हायरल होत आहे, ज्यात दावा करण्यात येतोय की, मोदींनी 15 लाख रुपये सॅलरीची मेकअप आर्टिस्ट नेमलेली आहे. ए सैलेरी वाली मेकअप आर्टिस्ट रखी है।


मात्र तपासणीमध्ये हा दावा खोटा असल्याचे स्पष्ट झाले. सोशल मीडियावर पंतप्रधान मोदींचा जो फोटो व्हायरल केला जात आहे तो दोन वर्षे जुना आहे. मोदींचा पुतळा लंडनच्या मदाम तुसादमध्ये बसवण्यासाठी जेव्हा त्यांच्या चेहऱ्याचे आणि शरिराचे माप घेण्यात आले होते त्यावेळी हे फोटो क्लिक करण्यात आले होते. 


व्हायरल फोटोमध्ये काय आहे? 
व्हायरल फोटोमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी एका खुर्चीवर बसलेले असून एक महिला त्यांच्याजवळ उभी असल्याचे दिसत आहे. महिलेच्या हातामध्ये एक बॉक्सही आहे. हा फोटो शेअर करत लिहिण्यात आले आहे की, 15 लाख रुपये पगार असलेल्या मेकअप आर्टिस्टच्या हातून सजून रडण्यासाठी आणि नौटंकी करण्यासाठी निघण्याची तयारी. फेसबूक आणि ट्वीटरवर वेगवेगळ्या अकाऊंटवरून हा फोटो शेअर करण्यात आला आहे. 


असा खोटा ठरला हा दावा.. 
या फोटोमागचे सत्य समजण्यासाठी आम्ही गूगल रिव्हर्स इमेज सर्चची मदत घेतली. हा फोटो आम्ही गूगलवर अपलोड करताच त्याचे सत्य समोर आले. 

 

बातम्या आणखी आहेत...