Home | Maharashtra | Marathwada | Aurangabad | Reality report on Ujjwala yojana dvm SIT special story

'उज्ज्वला'च्या दिव्याखाली अंधार: निष्क्रिय जोडण्यांची संख्या झाली 3.82 कोटी, जोडण्या वाढूनही खप घटला

एसआयटी टीम | Update - Feb 24, 2019, 10:48 AM IST

५४ महिन्यांत संख्या पोहोचली सुमारे ९० टक्क्यांवर

 • Reality report on Ujjwala yojana dvm SIT special story

  औरंगाबाद - महिलांना मदत व्हावी म्हणून मोदी सरकारने घरोघर गॅस पोहोचवण्यासाठी उज्ज्वला योजना सुरू केली. मात्र, ती सपशेल अपयशी ठरत आहे. पावणेतीन वर्षांत उज्ज्वला लाभार्थींची संख्या ६ कोटींच्या घरात पोहोचल्याचे सरकार सांगत असले तरी अर्ध्याहून कमी लोकांनी नियमित सिलिंडर विकत घेऊन याचा वापर सुरू ठेवला आहे. ५८ % शेतकऱ्यांना महागडे सिलिंडर परवडण्याजोगे नाही. त्यामुळे त्यांनी परत सिलिंडर घेतलेच नाही हे वास्तव समोर आले.


  २ जानेवारीला सहा कोटीव्या गॅस कनेक्शनचे वितरण उपराष्ट्रपतींच्या हस्ते करण्यात आले. या वेळी केंद्रीय पेट्रोलियममंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी गॅस कनेक्शन वाटपाबाबतची माहिती सांगितली. त्यांच्या मते ५० वर्षांत देशात १३ कोटी गॅस जोडण्या देण्यात आल्या, तर मोदी सरकारच्या ५४ महिन्यांतच यापेक्षा अधिक घरात गॅस पोहोचला. २०१४ मध्ये ही संख्या ५४ % होती. आता ती ८८.९८ % आहे. यात उज्ज्वलाच्या ६ कोटी कनेक्शनचा वाटा आहे. प्रत्यक्षात हे दावे फोल असल्याचे सरकारच्याच आकडेवारीवरून स्पष्ट होते.


  निष्क्रिय जोडण्याच वाढल्या
  3.55 कोटी
  एप्रिल 2016
  एप्रिल 2017
  एप्रिल 2018


  ...सिलिंडरच्या विक्रीत किंचित वाढ
  गॅस जोडण्यांची संख्या वाढल्याने गॅस सिलिंडरच्या विक्रीतही वाढ होणे अपेक्षित आहे. ती झाली. पण किंचितच. दोन वर्षांत गॅस जोडण्या ६ टक्क्यांनी वाढल्या असताना सिलिंडरचा खप पहिल्या वर्षात ०.८ टक्के, तर दुसऱ्या वर्षात १.२ टक्केच वाढला. दोन वर्षांत एलपीजी गॅसचा वापर अवघा ०.३ दशलक्ष मेट्रिक गॅस वापरातच नाही.


  नवीन कनेक्शन वाढले, पण...
  ३१ मार्च २०१९ पर्यंत ५ कोटी घरात गॅस पोहोचवण्याचे ध्येय होते. ते १ ऑगस्ट २०१८ म्हणजे २८ महिन्यांतच पूर्ण झाले. उज्ज्वलाची संख्या २०१६ मध्ये ३.८२ कोटींहून २०१८ मध्ये ५.०९ कोटींवर पोहोचली. २०२१ पर्यंत ८ कोटींचे नवीन टार्गेट ठेवण्यात आले. पैकी ६,४३,९७,८१२ घरात गॅस पोहोचला आहे.


  तीन महिन्यांत गॅस सिलिंडर नाही घेतले तर ती निष्क्रिय जाेडणी समजली जाते. भारतीय घरात वर्षाला सरासरी ७ सिलिंडरचा वापर होतो. उज्ज्वलामध्ये ही संख्या ४ आहे. याचा अर्थ अनेकांनी घेतलेले सिलिंडर रिफिलच केले नाहीत.


  ४४ टक्के लोकांनीच घेतले तिसऱ्यांदा सिलिंडर
  १४.२ किलोेचे ४ सिलिंडर याप्रमाणे आतापर्यंत २३ कोटी रिफिल झाल्याचा दावा आहे. पण मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार ऑगस्ट २०१८ पर्यंत ५.०२ कोटी गॅस कनेक्शनचे वाटप झाले. पैकी फक्त २.८३ कोटी म्हणजेच ५६ टक्के नागरिकांनीच दुसऱ्यांदा, तर अवघ्या ४४ टक्के लाभार्थींनी तिसऱ्यांदा सिलिंडर रिफिल केले.


  यामुळे फसली योजना
  २०१६ च्या आर्थिक सर्वेक्षणानुसार देशात ५८ टक्के शेतकरी हे एकवेळ उपाशी राहतात. देशातील १७ राज्यांतल्या म्हणजेच अर्ध्या शेतकऱ्यांचे वार्षिक उत्पन्न अवघे २० हजार रुपयांच्या आत आहे. अशा वेळी त्यांना ९०० रुपये भरून सिलिंडर घेणे अशक्य. ग्रामीण भागात घरापर्यंत सिलिंडर पोहोचत नाही. देशात १ लाख वापरकर्त्यांमागे फक्त ६.५ गॅस वितरक आहेत. उज्ज्वला कनेक्शन मोफत नसून कर्जावर दिले जाते. ३२०० रुपयांच्या संचात १६०० रुपयांचे अनुदान दिले जाते. सिलिंडर आणि शेगडीचा खर्च ग्राहकाला करावा लागतो. यासाठी हप्त्याची सुविधा आहे. हे हप्ते त्याच्या सबसीडीतून वजा होतात. चुली पेटलेल्याच.

Trending