• Home
  • Business
  • Realme 3 Pro launch at price 13,999 rupees have powerful fast charging support

बहुप्रतिक्षीत रिअलमी 3-प्रो भारतात लॉन्च, 25MP सेल्फी कॅमेरा आणि 4045mAh बॅटरीसोबतच आहेत हे दमदार फीचर्स, किंमत फक्त 13,999...


29 एप्रिलपासून सुरू होईल ऑनलाईन विक्री, फ्लिपकार्टवरून करा खरेदी 

दिव्य मराठी

Apr 22,2019 07:35:00 PM IST

गॅजेट डेस्क- ओप्पोचा सब ब्रॅंड असलेल्या रिअलमीने आपला फ्लॅगशिप स्मार्टफोन रिअलमी 3-प्रो भारतीय बाजारपेठेत लॉन्च केला आहे. फोनच्या 4 जीबी+ 64जीबी व्हॅरिएंटची किंमत 13,999 रूपये आणि 6 जीबी+128जीबी व्हॅरिएंटची किंमत 16,999 रूपये आहे. मागील महिन्यातच कंपनीने रिअलमी 3 लॉन्च केला होता. याच्या 3 जीबी रॅम आणि 32 जीबी स्टोरेज व्हॅरिएंटची किंमत 8,999 रूपये आहे. भारतात या फोनची टक्कर श्याओमीच्या 13,999 रूपये किंमत असणाऱ्या रेडमी नोट 7-प्रो सोबत असेल. यासोबतच कंपनीने रिअलमी C2 देखील लॉन्च केला आहे. याच्या 2 जीबी+16 जीबी व्हॅरिएंटची किंमत 5,999 रूपये तर 3 जीबी+32 जीबी व्हॅरिएंटची किंमत 7,999 रुपये ठेवण्यात आली, रिअलमी सी-2 ची विक्री 15 मेपासून सुरू होईल.


तीन कलर आणि दोन व्हॅरिएंट ऑप्शनमध्ये उपलब्ध
या फोनमध्ये 6.3 इंच फुल एचडी डिस्प्ले आहे, यात 2340*1080 पिक्सल रिझोलूशन आहे. फोनमध्ये 4045 mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. कंपनाचा दावा आहे की बॅटरी फास्ट चार्जिंगला सपोर्टेड आहे, त्यामुळे फोन फक्त 10 मिनिटांच्या चार्जिंगमध्ये 5 तासाचा टॉक टाईम देतो, शिवाय 7 तास पबजी, 9.5 तास व्हिडिओ आणि 18 तासांपर्यंत वेब ब्राउजिंग केली जाउ शकते.

फोटोग्राफीसाठी यामध्ये 25 मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. याव्यतिरिक्त फोनमध्ये ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप मिळतो, यामध्ये 16 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आहे, ज्यात सोनी IMX519 कॅमेरा लेंस आहे, त्यासोबत यात 5 मेगापिक्सलचा सेकेंडरी कॅमेरासुद्धा आहे. यात अल्ट्रा एचडी मोडचे ऑप्शन आहे जे 64 मेगापिक्सलचा फोटो कॅप्चर करण्यासाठी सक्षम आहे. फोनमध्ये 3.5 एमएम हेडफोन जॅकसोबत मायक्रो यूएसबी चार्जिंग पोर्ट देण्यात आले आहे. फोनच्या बॉक्समध्ये फोनसोबतच 20W VOOC 3.0 चार्जर मिळते.

फोनमध्ये सुपर स्लो मोशन फोटोग्राफी मोड, स्पीड मोड सारखे ऑप्शन देण्यात आले आहेत. यात पॉवरफुल स्नॅपड्रॅगन 710 प्रोसेसर आहे. हा फोन ब्लू, पर्पल आणि ग्रे या तीन कलर ऑप्शनमध्ये उपलब्ध आहे.

फ्लिपकार्टवर या फोनची विक्री 29 एप्रिलपासून सुरू होईल, पण ग्राहक या फोनला नवी दिल्लीतील पॅसिफिक मॉलमध्ये असलेल्या पॉप स्टोरवरूनदेखील खरेदी करू शकतात. या स्टोरमध्ये 27 एप्रिलला दुपारी 4.30 पासून फोनची विक्री सुरू होईल. कंपनीकडून सांगण्यात आले आहे की, रिअलमी 3-प्रोच्या पहिल्या एक हजार ग्राहकांना फोनसोबत रिअलमी इअर-बड मोफत मिळेल. याव्यतिरिक्त मोबिवीकवरून खरेदी करणाऱ्या ग्राहकांना 1,500 रूपयांपर्यंत कॅशबॅक मिळेल.

X