• Home
  • Business
  • Gadget
  • Realme 5 and 5 Pro design and key specs revealed to be launched at 20 august know features, price, variants details and

Gadget / 20 ऑगस्टला लॉन्च होत आहे रिअलमी 5 आणि 5 प्रो, यात मिळेल चार रिअर कॅमरे आणि 5000 mAh बॅटरी


जाणून घ्या रिअलमी 5 आणि 5 प्रोचे स्पेसिफीकेशन

दिव्य मराठी वेब

Aug 16,2019 05:21:00 PM IST

गॅजेट डेस्क- चीनी स्मार्टफोन कंपनी रिअलमीने 20 ऑगस्टला आपले दोन नवीन स्मार्टफोन रिअलमी 5 आणि रिअलमी 5 प्रोला लॉन्च करणार आहे. यात क्वाड कॅमरा सेटअप मिळेल, ज्यात प्रायमरी सेंसरशिवाय अल्ट्रावाइड अँगल, सुपर मॅक्रो आणि पोर्ट्रेट मोड्यूल आहे. कंपनीने आधीच स्पष्ट केले आहे की, याच्या प्रो व्हॅरिएंटमध्ये 48 मेगापिक्सलचे सोनी IMX586 सेंसर असेल.


भारतीय ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टने याच्या पेजला पोस्ट करुन 5 आणि 5प्रोचे डिझइन, कॅमरा आणि बैटरी पॉवरबद्दल माहिती दिली. दोन्ही स्मार्टफोन डायमंड-कट डिझाइनसोबत येतील.


फोनमध्ये मिळेल 5000 एमएएचची बॅटरी
भारतीय बाजारात फोनची किंमत किती असेल, याबाबत कोणतीही अद्याप माहिती समोर आलेली नाहीये. पण फ्लिपकार्टवर जारी केलेल्या रिअलमी 5 आणि 5 प्रोच्या डेडिकेटेड पेजमध्ये सांगण्यात आले आहे की, यात 5000 एमएएचची दमदार बॅटरी असेल. यासोबतच फोन व्हूक फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल.

X
COMMENT